हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) आजकाल प्रत्येकाचे आयुष्य अत्यंत व्यस्त, गडबडीचे आणि दगदगीचे झाले आहे. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडेच वेळ नाही. ना शारीरिक आरोग्य जपले जाते. ना मानसिक आरोग्य. ना त्वचेच्या आरोग्याकडे योग्य लक्ष दिले जाते. यामुळे कालांतराने आपण वयाआधीच वृद्ध होऊ लागतो. चार चौघात फिरताना आपल्याला नेहमी वाटतं की इतरांपेक्षा आपण सुंदर, तेजस्वी आणि लक्षवेधी दिसावं. पण आपल्याकडे त्वचेच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ नसल्यामुळे सौंदर्य हे केवळ शब्दापुरता मर्यादित राहतं. मग अशावेळी इतरांच्या सौंदर्याची तारीफ करण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरत नाही.
अनेकदा आपल्या वर्तमान वयापेक्षा आपला चेहरा जास्त प्रौढ दिसू लागतो. अशावेळी साहजिक आहे की, तुम्हाला न्यूनगंड निर्माण होऊ लागतो. तुमच्याही बाबतीत असंच होतंय का? तर काळजी करू नका. (Skin Care) रोजच्या दिवसातील काही मिनिटं फक्त स्वतःच्या त्वचेसाठी द्या. ज्यामुळे दिवसभराच्या थकव्यानंतरही तुमची त्वचा तुमचं वय कुणाला समजू देणार नाही. सौंदर्यासाठी खूप खर्च करणे, महागड्या ट्रीटमेंट घेणे गरजेचे आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही साफ चुकीचे आहात. कारण सौंदर्य ही विकत घेण्याची गोष्ट नाही. त्यामुळे अशा गोष्टींमागे स्वतःचा पैसा आणि वेळ वाया घालवणे आत्ताच थांबवा. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. ज्या तुमच्या त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी तुमची मदत करतील.
‘अशी’ घ्या त्वचेची काळजी (Skin Care)
1. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारात काही महत्त्वाचे बदल करा. जसे की रोजच्या दिवसातील पाण्याचे प्रमाण वाढवा. यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यासाठी मदत होईल. (Skin Care) तसेच आपल्या आहारात टोमॅटो, काकडी, कलिंगड, ब्रोकोली, गाजर, पालक, संत्र, मिक्स व्हेजिटेबल आणि दही किंवा ताक अशा पदार्थांचा समावेश करावा.
2. कोणत्याही ऋतूमध्ये घरातून बाहेर पडताना चेहऱ्यावर सन स्क्रीन लावायला विसरू नका. शिवाय उन्हाच्या वेळी घरातून बाहेर पडणार असाल तर चेहऱ्याला स्कार्फ जरूर बांधा. यामुळे टॅनिंग होण्याची शक्यता कमी होते.
3. आपला चेहरा धुताना त्यावर थेट साबणाचा वापर करू नका. (Skin Care) यामुळे त्वचा रखरखीत होण्याची शक्यता असते. कोणताही साबण किंवा फेसवॉश वापरताना आधी हातावर घ्या. त्याचा फेस तयार करा आणि मग चेहऱ्यावर लावा.
4. ओला चेहरा पुसताना आपल्या त्वचेवर टॉवेल किंवा टिशू घासू नका. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा फार नाजूक आणि संवेदनशील असते. यामुळे त्वचेला नुकसान होण्याची शक्यता असते.
‘या’ टिप्स फॉलो करा
1. रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून झोप. (Skin Care) यासाठी तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या किंवा डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या फेसवॉशचा वापर करा. ज्यामुळे दिवसभर चेहऱ्यावर लागलेली धूळ निघून जाईल आणि तुमचे पोअर्स स्वच्छ राहतील. या सवयीने तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
2. तसेच झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याला चांगले मॉइश्चरायझर अथवा सिरम लावा. जे तुमच्या त्वचेला मुलायम आणि ओलसर राहण्यासाठी मदत करतात.
3. चेहऱ्यासोबत केसांची काळजी घ्यायला विसरू नका. (Skin Care) झोपण्यापूर्वी केसांना तेल अथवा सिरम लावा. ज्यामुळे थकवा नाहीसा होईल आणि तुम्ही गाढ झोपू शकाल. यामुळे तुमची झोप पूर्ण होईल आणि तुमच्या चेहऱ्यावर थकवा येणार नाही. उलट तेज येईल.
4. जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग किंवा डोळ्याखाली डार्क सर्कल्स दिसत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही फेस क्रीमचा वापर करू शकता. (Skin Care)