Skin Care Tips : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी; नाहीतर, चेहऱ्याची चमक होईल कमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care Tips) आता राज्यभरात पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र वातावरण थंड झाले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आलेला पाऊस हा कायम दिलासादायक असतो. पण पावसासोबत येणारी आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण पावसाळा कितीही आल्हाददायी असला तरीही त्याच्यासोबत अनेक आजार आणि आरोग्यविषयक समस्या हजेरी लावतात.

खासकरून पावसाळ्याच्या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. ज्यामुळे त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आपल्याला त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. ती कशी घ्यायची? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर चिंता करू नका. (Skin Care Tips) कारण आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स देणार आहोत. ज्यामुळे पावसाळ्यातही तुमचा चेहरा तेजस्वी आणि चमकदार राहील. चला जाणून घेऊया.

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या त्वचेची काळजी
(Skin Care Tips)

चेहरा स्वच्छ पाण्याने धुणे

पावसाळ्यात हवामानात झालेला बदल आर्द्रता घेऊन येतो. (Skin Care Tips) ज्यामुळे आपली त्वचा चिकट होते. अशा परिस्थिती आपला चेहरा वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावा. म्हणजे चेहऱ्यावर साचलेला तेलकटपणा जाण्यास मदत होते.

सनस्क्रीन लावा

कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीन लावणे फायदेशीर ठरते. त्यामुळे पावसाळ्यात देखील त्वचेवर सनस्क्रीन लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होणार नाही.

वाफारा घ्या

पावसाळ्यात किमान २ दिवसांनी एकदा तरी आपल्या चेहऱ्याला वाफ द्या. यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स दूर होतील. शिवाय पोअर्समध्ये जर मातीचे कण अडकत असतील तर ते काढण्यास देखील मदत होईल.

मेकअप टाळा

पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो मेकअप करणे टाळा. कारण या दिवसात हवामानात आर्द्रता जास्त असते. (Skin Care Tips) त्यामुळे चेहऱ्यावर तेल साचते, घाम येतो. अशावेळी तुम्ही केलेला मेकअप तुमच्या त्वचेला नुकसान पोहचवू शकतो.