हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Skin Care) बऱ्याच लोकांना उकाडा सहन होत नाही. त्यामुळे असे लोक घरात चोवीस तास एसीचा वापर करतात. शिवाय विविध कार्यालये आणि ऑफिसेसमध्ये हमखास एसी असतो. असे दिवसभर एसीमध्ये राहणारे लोक अकाली वृद्धत्वाच्या समस्येने त्रासलेले दिसतात. निस्तेज आणि रखरखीत त्वचेमुळे अनेकदा गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. एसीमध्ये बसल्यामुळे त्वचा कोरडी होते आणि यामुळे सुरकुत्यांचे प्रमाण वाढते. जर तुम्हीही दिवसभर एसीमध्ये बसत असाल तर ही बातमी स्किप करू नका. कारण एसीचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी? याविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला लगेच जाणून घेऊया.
टोनरची मदत घ्या (Skin Care)
जर तुम्ही एसीमध्ये बसून तासन् तास काम करत असाल तर तुमच्या त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. एसीच्या हवेने तुमची त्वचा कोरडी पडू लागते आणि यामुळे त्वचेचा नैसर्गिक ओलावा निघून जातो. परिणामी आपली त्वचा कोरडी आणि रखरखीत लागते. शिवाय सुरकुत्यांचे प्रमाण वाढून अकाली वृद्धत्व येते. अशावेळी तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी टोनरची मदत घ्या. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या टोनरचा वापर करा. म्हणजे तुमची त्वचा निस्तेज होणार नाही.
हायड्रेटिंग मिस्ट
जर तुम्हाला एसीमुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळायचे असेल तर हायड्रेटिंग मिस्टचा वापर करा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहील. मुख्य म्हणजे, यासाठी खर्चात पडायची गरज नाही. घरच्या घरी हा हायड्रेटिंग फेस मिस्ट बनवा. यासाठी गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, ग्लिसरीन आणि पाण्याचा वापर करा. (Skin Care) गुलाबाच्या पाकळ्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवा आणि ही बॉटल एक तृतीयांश भरेल इतके ग्लिसरीन घ्या. उरलेली बॉटल पाण्याने भरा आणि हे मिश्रण नीट ढवळून घ्या. दिवसातून ३ – ४ वेळा हे फेस मिस्ट चेहऱ्यावर स्प्रे करा. यामुळे त्वचा हायड्रेट होण्यास मदत होईल.
रोझ ग्लिसरीन फेस मिस्टमूळे होईल ‘असा’ फायदा
ग्लिसरीनमध्ये त्वचेत ओलावा टिकवून ठेवतील असे बरेच घटक असतात. (Skin Care) त्यामुळे त्वचा मुलायम आणि तेजस्वी होण्यास मदत मिळते. तर गुलाबाच्या पाकळ्या आपल्या त्वचेतील पीएच पातळी संतुलित करतात आणि छिद्र घट्ट करण्याचे काम करतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत आणि आपल्या चेहऱ्याचा आकार बिघडत नाही.