Skin Redness | उन्हाळा पावसाळा किंवा दमट ऋतूमध्ये त्वचे संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. ज्या लोकांची त्वचा संवेदनशील आहे. ते लोक घराबाहेर पडताच त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण लालसरपणा येतो, खाज सुटते. परंतु अशावेळी नक्की काय करायचे? हे समजत नाही. कारण यावर जर केमिकल प्रॉडक्ट वापरले, तर त्यामुळे त्वचेची आणखी आग होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा (Skin Redness) आल्यास किंवा खाज येत असल्यास कोणत्याही प्रकारचे केमिकल प्रॉडक्ट्स वापरू नका. आज आम्ही तुम्हाला अशा परिस्थितीत घरच्या घरी चेहऱ्यावर लावण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होऊ शकतो.
गुलाबपाणी | Skin Redness
त्वचेवर गुलाबपाणी वापरल्याने कूलिंग इफेक्ट मिळतो. सनबर्नमुळे खराब झालेले त्वचेस बरे होण्यास मदत होते. तुमच्याही चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता किंवा काकडीचा रस गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्याला लावू शकता. हे लावल्यानंतर 10-15 मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. गुलाबजलाचा नियमित वापर केल्यास काही दिवसातच लालसरपणा दूर होतो.
मध
ब्युटी प्रोडक्ट म्हणून मधाचा वापर फार पूर्वीपासून होत आहे. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. यामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेची लालसरपणा आणि सूज दूर करण्यास मदत करतात. त्वचेवर रॅशेस आणि खाज येण्याची समस्या दूर करण्यातही खूप मदत होते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणाची समस्या असेल तर प्रभावित भागात मध लावा आणि 15-20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर पाण्याने धुवा. असे दिवसातून २-३ वेळा केल्याने लालसरपणा लवकर निघून जाईल.
कोरफड | Skin Redness
कोरफडमध्ये बरे करण्याचे गुणधर्म आहेत. जे चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यास मदत करतात. तुमच्याही चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. दिवसातून किमान 2-3 वेळा असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
बर्फ
लालसरपणा दूर करण्यासाठी बर्फ हा रामबाण उपाय आहे. बर्फ लावल्याने लालसरपणा कमी होण्यास मदत होते. यासाठी एका मऊ सुती कपड्यात बर्फाचा तुकडा घालून चेहऱ्याला लावा. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचा चेहरा थंडगार पाण्याने धुवू शकता, यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
नारळ तेल
नारळाच्या तेलामध्ये बुरशीविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. खोबरेल तेल त्वचेची एलर्जी आणि लालसरपणा दूर करण्यास मदत करते. जर तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा येत असेल तर बाधित भागावर खोबरेल तेल लावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.