Bank FD : स्मॉल फायनान्स बँका FD वर देत आहे जबरदस्त रिटर्न, पारंपारिक बँकांपेक्षा जास्त फायदे उपलब्ध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bank FD : बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याने जमा केलेल्या भांडवलावर जास्त व्याज मिळण्याची ईच्छा असते. ज्यामुळे देशात FD वर सर्वाधिक व्याज कोणती बँक देत आहे याची माहिती प्रत्येक गुंतवणूकदार घेत असतो. Bank FD

Bajaj Finance Hikes FD Rates: Check Revised Interest Rates For Sr Citizens,  New Tenure HERE

देशातील सर्वसामान्य नागरिक पोस्ट ऑफिसमधील बचत योजनांना सुरक्षित मानतात. मात्र बँकांच्या अनेक एफडी स्कीममध्ये पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपेक्षाही चांगले व्याज मिळत आहे. हे जाणून घ्या कि, सध्याच्या काळात अनेक स्मॉल फायनान्स बँका देखील पोस्ट ऑफिस आणि इतर बँकांपेक्षा फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याजदर देत आहेत. काही स्मॉल फायनान्स बँका तर ज्येष्ठ नागरिकांना FD वर 9% आणि त्याहून जास्त व्याज देत आहेत. Bank FD

Why Do Fixed Deposit Rates Differ For Every Financier? - Hindustan Times

स्मॉल फायनान्स बँकेत पैसे ठेवणे सुरक्षित आहे का ???

मात्र अनेकदा प्रश्न असा पडतो की, स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पैसे ठेवणे कितपत सुरक्षित आहे ??? तसेच अशी बँक बुडाल्यास किंवा दिवाळखोर झाल्यास, ठेवीदाराच्या पैशांचे काय होणार ??? याबाबत एकमात्र दिलासा म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन म्हणजेच DICGC. DICGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेतील प्रत्येक ठेवीदाराचा बँकेचा लायसन रद्द केल्याच्या तारखेला किंवा विलीनीकरणाच्या किंवा पुनर्बांधणीच्या दिवशी त्याच्याकडे असलेल्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा उतरवला जातो. म्हणजेच आपली सर्व खाती एकत्र करून एकाच बँकेत कितीही पैसे जमा केलेले असले तरीही आपल्याला फक्त 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. Bank FD

DICGC increases the insurance coverage for depositors to 5 lakh

DICGC कडून या खात्यांवर मिळेल विमा संरक्षण

DICGC द्वारे ऑफर केलेले विमा संरक्षण सेव्हिंग अकाउंट्स, एफडी, करंट अकाउंट्स, आरडी इत्यादी डिपॉझिट्सवर लागू असेल. DICGC च्या डिपॉझिट इन्शुरन्समध्ये LABs, PBs, SFBs, RRB आणि सहकारी बँकांसह सर्व विमा उतरवलेल्या व्यावसायिक बँकांचा देखील समावेश होतो. आपले पैसे बँकेत जमा केले असल्यास, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून ते डिपॉझिट्स विम्यासाठी रजिस्टर्ड आहे की नाही ते तपासू शकता…

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.dicgc.org.in/FD_ListOfInsuredBanks.html

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत बदल, जाणून घ्या आपल्या शहरातील नवीन दर
Valentine’s Day Offers : व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळेल जबरदस्त डिस्काउंट,
Amul सोबत अशा प्रकारे बिझनेस करून दरमहा मिळवा लाखो रुपये !!!
व्हॅलेंटाइनसाठी Jio ने आणल्या जबरदस्त ऑफर्स, ग्राहकांना मिळणार 12GB फ्री डेटा
Refurbished Phones : जुना फोन खरेदी करण्यासाठी ‘या’ 3 सर्वोत्तम वेबसाईट्स, कमी किंमतींत मिळेल प्रीमियम फोन