Refurbished Phones : जुना फोन खरेदी करण्यासाठी ‘या’ 3 सर्वोत्तम वेबसाईट्स, कमी किंमतींत मिळेल प्रीमियम फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Refurbished Phones : सध्याच्या काळात अनेक नवनवीन स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. ज्यामध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले जात आहेत. मात्र या फोनच्या किंमती जास्त असल्यामुळे अनेकांना ते खरेदी करता येत नाहीत. अशाच ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन सध्या देशात अशा अनेक वेबसाइट्स सुरु झाल्या आहेत, ज्याद्वारे Refurbished Phones म्हणजेच जुन्या फोनची खरेदी आणि विक्री केली जात आहे. जर आपल्यालाही कमी किंमतींत एखादा चांगला सेकंड हँड मोबाइल फोन घ्यायचा असेल तर या वेबसाइट्सच्या मदतीने खरेदी करता येईल.

Buying Second Hand Phones, जरा ठहरिए! सेकेंड हैंड फोन खरीदने से पहले नहीं  किया ये काम तो अभी करें, नहीं पड़ेगा पछताना - are you planning to buy a  second hand mobile

Refurbished Phones चा सर्वात मोठा फायदा असा कि, ते अगदी किंमतींत उपलब्ध होतात. अशा परिस्थितीत, कमी बजट असलेल्या ग्राहकांसाठी हे सेकंड हँड फोन फायदेशीर ठरतात. तर आज आपण अशा 3 विश्वसनीय वेबसाइट्सबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे हे फोन खरेदी करता येतील.

Olx Stock Photos - Free & Royalty-Free Stock Photos from Dreamstime

जुने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी OLX हा सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म आहे. OLX ने ​​भारतात आपला व्यवसाय तेव्हा सुरू केला जेव्हा सेकंड हँड गोष्टींच्या खरेदी-विक्रीसाठी जास्त वेबसाइट्स किंवा Apps उपलब्ध नव्हते. ज्यामुळेच ग्राहक आजही जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी OLX लाच पसंती देतात. Refurbished Phones

Amazon India Black Friday sale 2022: Check out offers on TVs, headphones  and more | Technology News,The Indian Express

ईकॉमर्स वेबसाइट असलेल्या Amazon India ने देखील आता स्मार्टफोन मार्केटमध्ये उडी घेत आपल्या प्लॅटफॉर्मवर जुन्या मोबाईल फोनची विक्री करत आहे. यासाठी Amazon ने Renewed नावाने एक वेगळा सेगमेंट देखील तयार केला आहे. यामुळे जर सेकंड हँड फोन घ्यायचा असेल तर Amazon वर चांगला सेकंड हँड फोन मिळू शकेल . Refurbished Phones

Cashify expands services across 1,500+ Indian cities || Cashify expands  services across 1,500+ Indian cities

सेकंड हँड फोनच्या बाजारात Cashify वेगाने प्रगती केली आहे. ही वेबसाइट ग्राहकांना जुने फोनची विक्री आणि खरेदी घेण्यासाठी प्लॅटफॉर्म देते. याद्वारे ग्राहकांना आपला आवडता सेकंड हँड फोन खरेदी करता येईल. इतकेच नाही तर Cashify वर ग्राहकांना वेळोवेळी डिस्काउंट ऑफर देखील मिळते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.cashify.in/

हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, ​​कर्जावरील व्याजदरात केली वाढ