Small Finance Banks | आपल्या देशात अनेक बँका आहेत. परंतु तरी देखील देशाला नवीन बँका मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेने शुक्रवारी लघु वित्तीय बँकांकडून अर्ज देखील मागवलेले आहेत. जर त्यामध्ये कोणताही अडथळा जाणवला नाही, तर आरबीआयद्वारे नियमित आणि सार्वत्रिक बँकेचा दर्जा त्यांना दिला जाऊ शकतो. देशात सध्या अनेक लघुवित्त बँका आहे. Au Small Finance Bank, Equitas Small Finance Bank आणि Ujjivan Small Finance Bank या बँकांचा समावेश आहे.
2014 मध्ये रिझर्व बँक (Small Finance Banks) ऑफ इंडियाने खाजगी क्षेत्रातील लघु वित्तीय बँका चालवण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती. आणि त्यानुसार रेग्युलर आणि युनिव्हर्सल बँकेचा दर्जा मिळवण्यासाठी मागील तीन महिन्याच्या बँकेची संपत्ती ही 1000 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
याबाबत सेंट्रल बँकेने असे म्हटले आहे की, स्मॉल फायनान्स बँकेच्या प्रवर्तकांसाठी कोणतेही विशेष नियम लागू होणार नाहीत. परंतु युनिव्हर्सल बँकेच्या स्थापनेनंतर प्रवर्तक तेच राहिले पाहिजे त्यांना प्रवर्तक बदलण्याची परवानगी नाही. 2015मध्ये आरबीआयने हेच बंधन बँकांनी आयडीएफसी फर्स्ट बँकेला नियमित बँक बनवण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यानंतर अजूनही कोणत्याही नवीन बँकेला परवानगी मिळाली नाही.
देशात (Small Finance Banks) अनेक ठिकाणी बँकिंग व्यवस्था चालू आहे. परंतु अजूनही ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी बँका सुरू नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक हे बँकेचे सेवेपासून वंचित राहतात. त्यांना या व्यवहारांसाठी शहरांमध्ये जावे लागते. त्यामुळे देशातील ग्रामीण भागात बँकेच्या सुविधा पुरवण्यासाठी लघु वित्तीय बँकेने स्थापना करण्यात आलेली आहे. सरकारने या छोट्या बँकांना परवाना दिला आहे. कारण देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी, हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. ज्या ठिकाणी व्यावसायिक बँका कमी असतात, त्या ठिकाणी अशा बँका चांगल्या व्यवसाय करतात.