हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Small Mobile Recharge Plan) आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे फोन असतो. दूरवर असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत संवाद साधण्यासाठी मोबाईल तर हवाच. दिवसातला बराच वेळ आपण फोनवर गप्पा मारण्यात घालवतो. यासाठी लागणारा रिचार्ज हा ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभराचा असतो. दिवसागणिक रिचार्जचे दर वाढतच चालले आहेत. अशातच कमी पैशात चांगला रिचार्ज प्लॅन शोधणाऱ्यांची काही कमी नाही. जर तुम्हीही कमी पैशात चांगला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर मग ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
जर तुम्ही रिलायन्स जिओ किंवा एअरटेल युजर असाल तर ही बातमी नीट वाचा. रिलायन्स जिओ आणि एअरटेलमध्ये २५० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. (Small Mobile Recharge Plan) जे भरमसाठ डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा प्रदान करतात. हे रिचार्ज प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह नियमित १.५ जीबी डेटा देतात. त्यामुळे कमी पैशात जबरदस्त रिचार्ज प्लॅन शोधताय तर याविषयी जाणून घ्या.
रिलायन्स Jio चे छोटे रिचार्ज प्लॅन (Small Mobile Recharge Plan)
१७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन – रिलायन्स जिओच्या १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वैधता मिळते. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये नियमित १०० SMS मॅसेज, रोज १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल इतक्या सुविधा मिळतात.
२३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन – रिलायन्स जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता प्रदान केली जाते. (Small Mobile Recharge Plan) तसेच या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा, रोजचे १०० SMS आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल अशा सुविधा मिळतात.
Airtel चे छोटे रिचार्ज प्लॅन
१७९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन – एअरटेलसुद्धा १७९ रुपयांचा छोटा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. हा छोटा रिचार्ज प्लॅन खास कॉलिंगसाठी लॉन्च करण्यात आला असून यात एकूण २ जीबी डेटा, ३०० SMS आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलची सुविधा मिळते. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. (Small Mobile Recharge Plan)
२३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन – एअरटेलचा २३९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन देखील छोटा प्लॅन आहे. ज्यात २४ दिवसांची वैधता मिळते. तसेच या प्लॅन अंतर्गत १ जीबी नियमित डेटा, दररोज १०० SMS आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. मुख्य बाब अशी की, एअरटेलचे दोन्ही प्लॅन अमेझॉन प्राइम मोबाइल एडीशन सबस्क्रिप्शनसह येतात.
Jio का Airtel ? कोणता छोटा रिचार्ज प्लॅन अधिक फायदेशीर?
तसं तर रिलायन्स जिओ आणि एअरटेल दोन्हीकडून छोटे रिचार्ज प्लॅनची सुविधा उपलब्ध आहे. दरम्यान, १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर, एअरटेलचा प्लॅन फायदेशीर वाटतो. कारण, एअरटेलच्या १७९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. तर जिओच्या प्लॅनमध्ये दररोज फक्त १ जीबी डेटा मिळतो.
तसेच २३९ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ एअरटेलपेक्षा जास्त फायदेशीर वाटतो. कारण, जिओच्या २३९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये एअरटेलपेक्षा १८ जीबी जास्त डेटा मिळतो. (Small Mobile Recharge Plan)