Small Saving Scheme | 2023 -24 चे आर्थिक वर्ष संपण्यास थोडेच दिवस राहिलेले आहेत. अगदी 2 दिवसातच नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. या आर्थिक वर्षासाठी मोदी सरकारने अनेक योजनांची घोषणा केलेली आहे. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना, PPF यांसारख्या योजनांची घोषणा केलेली आहे. त्याचप्रमाणे 1 एप्रिल 2024 पासून छोट्या बचत योजना (Small Saving Scheme) सुरू होणार आहे. त्यांच्या व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. पुढील आर्थिक वर्षाच्या तिमाहीसाठी लहान बचत योजनेच्या व्याजदरांमध्ये कोणतेही बदल केलेला नाही. असे देखील अर्थमंत्रालयाने सांगितलेले आहे.
अर्थ मंत्रालयाने केलेल्या अधिसूचनेनुसार आर्थिक वर्ष 2024- 25 यांच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून यादरम्यान लहान बचत योजनांवरील व्याजदर चौथ्या तिमाहीसाठी जानेवारी ते मार्च या अधिसूचित दरांप्रमाणेच असतील.
PPF व्याजदर
लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या एका नव्या अधिसूचनेनुसार सार्वजनिक भविष्य निर्वाह म्हणजेच PPF वर पूर्वीप्रमाणे 7.1% एवढे व्याज दिले जाईल. त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 8.2 टक्के व्याज मिळेल तर 3 वर्षाच्या मुदत ठेवीवरील व्याज 7.1% असेल. त्याचप्रमाणे किसान विकास पत्रावरील व्याजदर हे 7.5% एवढी असेल.
इतर योजनांवरील व्याजदर | Small Saving Scheme
सरकारच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र या योजनेवर 1 एप्रिल ते 30 जून 2024 या कालावधीसाठी 7.7 टक्के एवढे व्याजदर असेल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत असलेल्या ठेवींवर 8.2% एवढे व्याज मिळेल केंद्र सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केलेली होती. मुलींचे शिक्षण त्याचप्रमाणे त्यांचे लग्न नीट व्हावे यासाठी सरकारने ही एक मोठी योजना चालू केली होती. सरकारने सुरू केलेली या सुकन्या समृद्धी योजनेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि आता अनेक लोक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत.