साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती आहे की… धोनीसमोरच जडेजा काय बोलून गेला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्यातील दोस्ती आपल्या सर्वांचा माहित आहे. दोघेही एकमेकांबद्दल भरपूर काही सांगत असतात. मधल्या काळात दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता जडेजाने धोनीबद्दल असं एक विधान केलं आहे ज्यामध्ये दोघांमध्ये सर्व काही आलबेल आहे हे सिद्ध होत आहे. साक्षी भाभीनंतर मीच असा व्यक्ती आहे की ज्याला धोनीने उचलून घेतलं असेल असं म्हणत जडेजाने धोनीसमोर हसत हसत खिल्ली उडवली.

मागील वर्षी गुजरात टायटसन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अंतिम सामन्यात चेन्नईला विजयासाठी २ चेंडूत १० धावांची गरज होती. त्याचवेळी जडेजाने १ षटकार आणि १ चौकार मारत चेन्नई सुपर किंग्सला अशक्यप्राय विजय मिळवून दिला आणि संघाने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली. या ऐतिहासिक विजयानंतर तत्कालीन कर्णधार धोनीने जडेजाला उचलून आनंद व्यक्त केला होता. याच क्षणाची आठवण काढताना एका कार्यक्रमात जडेजा गमतीने म्हणाला की कदाचीत धोनीची पत्नी साक्षीनंतर मीच तो एकमेव व्यक्ती असेल ज्याला धोनीने उचलले आहे. जडेजाच्या या विधानानंतर धोनीसह चेन्नई सुपर किंग्जचे इतर खेळाडूही हसताना दिसले.

धोनीने केलं जडेजाचे कौतुक –

या कार्यक्रमादरम्यान महेंद्रसिंग धोनीने अंतिम सामन्यात जडेजाच्या मॅच-विनिंग खेळीबद्दल कौतुक केले. धोनी म्हणाला मॅच जिंकण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे ते सर्व गुण जडेजाकडे आहेत त्यामुळे मला विश्वास होता कि जडेजा सामना जिकवू शकतो. जडेजाची २०२३ आयपीएल फायनल मधील खेळी कधीही न विसरता येणारी आहे. अंतिम ओव्हर मध्ये फलंदाजी करताना किती दबाव असतो याची कल्पना आपण टीव्ही वर सामना बघत करू शकत नाही. . मला आनंद आहे की आम्ही जिंकलो. त्यावेळी सर्वांच्याच भावना उंचबळून आलेल्या होत्या.