Smallest Washing Machine Of World | सध्या सोशल मीडिया हे एक असे साधन झाले आहे.तिथे लोक आपली कला आणि आपले टॅलेंट दाखवत असतात. आणि ते जगापर्यंत पोहोचवत असतात. परंतु सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ चक्क गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती काहीतरी बनवत आहे. हा व्यक्ती जगातील सगळ्यात छोटी वॉशिंग मशीन बनवताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा भारतातील आंध्रप्रदेश या राज्यात राहतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने शेअर केलेल्या या व्हिडिओमधे त्याने जगातील सगळ्यात छोटी वॉशिंग मशीन बनवली आहे. आणि शेवटी ती कसे काम करते हे देखील दाखवले आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्यांनी लिहिलेले आहे की, ‘साई थिरुमलानिडी यांनी बनवलेले सर्वात लहान वॉशिंग मशीन 37 मिमी x 41 मिमी x 43 मिमी (1.45 इंच x 1.61 इंच x 1.69 इंच) मोजते.’
या व्हिडिओमध्ये तो व्यक्ती छोट्या छोट्या पार्टचा उपयोग करून वॉशिंग मशीन बनवताना दिसत आहे. त्यानंतर तो स्विच ऑन करून देखील दाखवतो. या मशीनमध्ये एका छोट्या आकाराचा पाईप देखील लावताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पुढे साई त्या कपड्याच्या मशीनमध्ये कपड्याचे दोन छोटे छोटे तुकडे पाणी आणि डिटर्जंट मध्ये टाकतो आणि नंतर मशीनमध्ये टाकून दाखवतो की, ती मशीन कशी काम करते. या व्हिडिओमध्ये त्या मशीनमध्ये कपडा स्वच्छ होताना दिसत आहे.
या व्हिडिओला आत्तापर्यंत 5.1 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यू झालेले आहेत. तसेच ही संख्या वाढतच चाललेली आहे. त्याचप्रमाणे लोक कमेंट करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण या व्यक्तीचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करून दिले आहे की, “भावा तू खूप चांगले काम केले आहे.” एका दुसऱ्या एका युजरने लिहिलेले आहे की, “प्रॅक्टिकलमध्ये हे नीट काम करणार नाहीत तरी पण बघायला खूप चांगले वाटत आहे.” अनेक लोक त्याच्या या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत आहे.