Smart Prepaid Meter : तुम्ही नेहमी मोबाईलचा प्रीपेड रिचार्ज करत असाल. पण आता विजेच्या वापरासाठी सुद्धा रिचार्ज सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट फोन प्रमाणे आता स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत. जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार रिचार्ज करू शकता. शिवाय रिचार्ज संपण्यापूर्वी तुम्हाला मोबाईलवर नवा रिचार्ज (Smart Prepaid Meter) करण्यासाठी मेसेज अलर्ट सुविधा सुद्धा मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सिंगल व थ्री फेजच्या एकूण 68 लाख 39 हजार 752 20 ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे. यासोबतच महावितरणच्या वितरण यंत्रणेतील विजेचा हिशोब आणखी अचूक ठेवण्यासाठी एक लाख 28 हजार 623 वितरण रोहित्र व वीस ग्राहकांच्या घरी टप्प्याटप्प्यांने स्मार्ट मीटर (Smart Prepaid Meter) पश्चिम महाराष्ट्रात बसवण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे.
विजेवरील खर्च नियंत्रणात (Smart Prepaid Meter)
सध्याची पारंपारिक प्रणाली वीज मीटरच्या प्रणालीमध्ये 68 लाख 40 हजार ग्राहकांकडे जाऊन दर महिन्याला मीटरचे फोटो (Smart Prepaid Meter) रीडिंग घेणं त्यानुसार विज बिल तयार करणे आणि बिलांच वितरण करणे या प्रक्रियेत काही दिवसांचा कालावधी जातो. तसंच घराला कुलूप असल्याने रीडिंग न घेता येणे चुकीचे असल्यास दुरुस्ती करणे मीटर नादुरुस्त होणे तसेच वीज बिलांचा भरणा न होणे, थकबाकीमुळे विजापुरवठा खंडित करणे अशी कारणे उद्भवतात. त्यामुळे स्मार्ट मीटरिंग ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वीज ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर (Smart Prepaid Meter) अत्यंत उपयुक्त असून त्यामुळे विजेवरील खर्च नियंत्रणात राहील. पाहिजे तेवढ्याच विजेचा वापर करता येईल आणि बिलिंग च्या तक्रारी संपुष्टात येतील अशी माहिती पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी एका माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मोफत स्मार्ट मिटर
- वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर (Smart Prepaid Meter) मोफत देण्यात येणार आहे.
- विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा किती वीज वापरायची याचं नियोजन करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
- त्यामुळे आर्थिक बचत करता येईल.
- मोबाईल प्रमाणे रिचार्ज करण्याची सुविधा घर बसल्या ग्राहकांना ऑनलाइन द्वारे उपलब्ध होणार आहे.
- रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज किती वीज वापरली रक्कम एकूण किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आला याची माहिती मोबाईल द्वारे मिळत राहील