हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphone आता होळीचा जल्लोष सुरु झाला आहे. मात्र होळीला रंग खेळताना अशा काही गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घेणे महत्वाचे ठरते. त्यापैकीच एक म्हणजे स्मार्टफोन. होळीला पाण्यामध्ये आपला स्मार्टफोन पाण्यापासून सुरक्षित ठेवणे खूप गरजेचे आहे. मात्र जर चुकून आपला Smartphone पाण्यात पडला तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आपण अशा काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्याद्वारे मोबाईल खराब होण्यापासून वाचवता येईल. चला तर मग पाण्यात पडलेला मोबाईल कसा दुरुस्त करायचा ते जाणून घेउयात…
मोबाईल लगेचच बंद करा
जर आपला Smartphone पाण्यात पडला तर तो तातडीने बंद करा. कारण जर असे केले नाही तर यामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत आपला फोन बंद करा. तसेच तो लगेचच उघडण्याचा प्रयत्न करू नका.
फोन कव्हर काढा
जर कधी चुकून आपला फोन पाण्यात पडला तर लगेचच त्याचे कव्हर काढून टाका. कारण यामुळे कव्हरचे पाणी फोनमध्ये जाणार नाही. तसेच फोनचे जास्त नुकसान देखील होणार नाही.
तांदळात ठेवा ओला झालेला फोन
इथे हे लक्षात घ्या कि, तांदूळ हे चांगल्या प्रकारे ओलावा शोषून घेते. म्हणूनच 24-48 तास तांदूळ भरलेल्या भांड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये आपला भिजलेला Smartphone ठेवण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. असे केल्याने आपल्या फोनमधील पाणी पूर्णपणे सुकून जाण्यास मदत होईल.
फोन लगेचच चार्ज करू नका
आपला Smartphone पूर्णपणे कोरडा होईपर्यंत चार्ज करू नका. कारण ओले झालेले कोणतेही उपकरण चार्ज केल्याने ते खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्यात भिजलेला फोन किमान 5 तास तरी चार्ज करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
हे पण वाचा :
Business Idea : ‘या’ वनस्पतीची लागवड करून मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Smartphone वापरताना कधीही करू नका ‘या’ चुका, अन्यथा होऊ शकेल मोठे नुकसान
Edible Oil : होळीच्या दिवशी मागणीत वाढ होऊनही खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या
Budget Smartphones : 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे सर्वोत्तम 5 स्मार्टफोन, तपासा किंमत अन् फीचर्स
Recharge Plans : ‘या’ टेलिकॉम कंपन्या 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्लॅनअंतर्गत देत आहेत अनेक फायदे