Snehal Shidam : CHYD फेम अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री; पहिल्याच सिनेमात शाहिदसोबत झळकली

Snehal Shidam
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन अभिनित ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. जबरदस्त कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतोय. हा एक रोबॉटिक सिनेमा असून याचं कथानक अत्यंत वेगळ्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. एकूण २ तास २३ मिनिटांच्या या सिनेमात मराठी प्रेक्षकांना एक सरप्राईज एंट्री पहायला मिळते आहे. (Snehal Shidam)

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमिक शो अर्थात ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून अनेक कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमातून विनोदवीरांनी आपल्या परफेक्ट कॉमिक टायमिंग आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. केवळ भारतात नव्हे तर विदेशापर्यंत या कार्यक्रमातील विनोदवीरांची ख्याती आहे. ज्यामध्ये अभिनेत्री स्नेहल शिदमचा समावेश आहे. (Snehal Shidam) एका स्पर्धेच्या माध्यमातून स्नेहल शिदम ‘चला हवा येऊ द्या’चा भाग झाली. यानंतर तिने काही मराठी सिनेमांत काम केले आणि आता तिची बॉलिवूडमध्ये एंट्री झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

अभिनेत्री स्नेहल शिदमने ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात छोटी मात्र प्रभावी भूमिका साकारली आहे. याबाबत तिने स्वतःच आज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. काही तासांपूर्वी तिने हि पोस्ट शेअर करताना यामध्ये अभिनेता शाहिद कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam)

(Snehal Shidam)या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय शाहीद कपूर आणि क्रिती सॅनन यांचा नवीन हिंदी सिनेमा “तेरी बातो में ऐसा उलझा जिया” नुकताच प्रदर्शित झाला आहे यात माझी एक शोटीशी भुमिका आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा सिनेमा आणि कसा वाटतोय ते सांगा तुमच प्रेम आणि आशीर्वाद असच राहुद्या’. स्नेहलच्या या पोस्टवर नेटकरी, चाहते आणि तिच्या मित्र मैत्रिणींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.