नवी दिल्ली । टेलीकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) म्हटले आहे की,” बँका, लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स बिझनेस युनिटसना आपल्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर कमर्शियल SMS पाठविण्यासाठी टेलिमार्केटिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण करणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांच्या ग्राहकांना कमर्शियल SMS पाठविण्यावर बंदी येईल. जर या कंपन्यांनी ट्रायच्या नियमांचे पालन केले नाही तर बँका, लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स कंपन्यांकडून मिळणारे कमर्शियल SMS तीन दिवसांनंतर बंद होतील. अशा परिस्थितीत ग्राहकांना बँकिंग, शॉपिंग आणि इतर कामांमध्ये अडचणी येऊ शकतील.
ट्रायने दिली 3 दिवसांची मुदत
ट्रायने सांगितले की ,”स्पॅम मेसेज आणि ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी नवीन SMS रेग्युलेटरी आणली गेली आहे. ट्रायने सांगितले की,”ज्या कंपन्यांनी अद्याप या नियमनाचे पालन केलेले नाही त्यांना या नवीन नियमांनुसार रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ज्या कंपन्या 3 दिवसानंतरही हे करणार नाहीत, त्यांचे नाव एक डीफॉल्टर कंपनी म्हणून कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट केले जाईल. ट्राय म्हणाले,” ज्या कंपन्या नवीन चौकट लागू करणार नाहीत त्यांना 3 दिवसानंतर बल्क SMS पाठवण्यापासून रोखले जाईल.”
8 मार्च रोजी OTP येणे बंद झाले
SMS सेवेत व्यत्यय आल्याने बँक, ई कॉमर्स आणि इतर कंपन्यांसाठी SMS मिळण्यास उशीर होत होता. ही समस्या कोणत्याही एका नेटवर्क किंवा अॅपमध्ये नव्हती, तर ती सर्वत्र होती. CoWIN रजिस्ट्रेशन OTP, डेबिट कार्ड ट्रान्सझॅक्शनसाठी बँक OTP आणि अगदी सिस्टीम बेस्ड टू-फ़ॅक्टर ऑथेंटिकेशन OTP ला उशीर होत होता. SMS शी संबंधित नवीन नियम लागू केले गेले आहेत जेणेकरून SMS द्वारे फसवणूक रोखता येईल. परंतु नवीन SMS रेग्युलेटरी लागू झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू लागल्या. यामुळे ट्रायने हा नवीन नियम 7 दिवसांसाठी स्थगित केला. या नवीन नियमांमुळे OTP आणि SMS मिळण्यास अडचण आल्याच्या तक्रारी आल्यानंतर ट्रायने हा निर्णय घेतला आणि कंपन्यांना नवीन चौकट अवलंबण्यास आणखी 7 दिवसांचा कालावधी दिला.
संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घ्या?
किंबहुना, दिल्ली हायकोर्टाने टेलीकॉम रेगुलेटर TRAI ला बनावट SMS त्वरित थांबविण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे सामान्य लोकं आरामात यामध्ये फसू शकत होती. कोर्टाचा हा आदेश पूर्ण करण्यासाठी TRAI ने नवीन DLT सिस्टीम सुरू केली. नवीन DLT सिस्टीममध्ये, रजिस्टर्ड टेम्पलेटसह प्रत्येक SMS चा कंटेन्ट व्हेरिफाय केल्यानंतरच डिलिव्हरी केला जाईल. या पूर्ण प्रक्रियेला स्क्रबिंग असे म्हणतात. या आधी देखील हि सिस्टीम लागू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र 8 मार्च पासून तो लागू केला गेला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.