कराड प्रतिनिधी। विशाल वामनराव पाटील
बहुजन परिवाराचे सामाजिक, शैक्षणिक कार्य चांगले आहे. समाजात एकता, बंधुता असणे गरजेचे आहे. महापुरुषांच्या विचारांची सध्या समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त महापुरूषांचा संयुक्त जयंती महोत्सव व शिक्षण परिषद संपन्न झाली. या कार्यक्रमास थोर विचारवंत अॅड वैशालीताई डोळस, अनुपम मोरे, महेश लोखंडे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, भागविस्तार अधिकारी जमिला मुलाणी, विस्तार अधिकारी सागर बोलके, कराड केंद्रप्रमुख श्री. सोनवणे, परिवर्तन प्रतिष्ठान अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड, सयाजी कांबळे, तानाजी गायकवाड, कापील गावच्या सरपंच कल्पना गायकवाड, संचालक महेंद्र जानुगडे, संगिता वाघमारे, चंद्रकांत गायकवाड, सुनंदा पाटणकर, शारदा लोकरे, रुपाली काटे, गौतमी धुमाळे यांच्यासह केडर बंधू भगिनी उपस्थित होते.
बहुजन शिक्षक संघाचे कराड तालुका अध्यक्ष महेश लोखंडे यांनी लेखन केलेली बहुजन शिक्षक परिवाराची कार्यकर्ता (केडर) मार्गदर्शक पुस्तिका यांचे प्रकाशन प्रमुख वक्त्या वैशालीताई डोळस यांचे हस्ते झाले. अनिस नायकवडी गटशिक्षणाधिकारी कडेगाव यांनी बहुजन शिक्षक परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास विशेष पुरस्कार म्हणून रणजित खाशाबा जाधव अध्यक्ष ऑलम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव प्रतिष्ठान यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठीचा क्रीडागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले. या कार्यक्रमात शिक्षण परिषदेमध्ये जिल्हा बहुजन शिक्षक परिवाराचे कुटुंब प्रमुख प्रविण लादे यांनी हरघर संविधान व संविधानाचा प्रचार प्रसार याची सुरुवात शिवजन्मोत्सवापासून सुरू केलेली आहे.
बहुजन शिक्षण परिषदेमध्ये आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन समिती पुरस्कार, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सत्कार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करणेत आला. या महोत्सवप्रसंगी पैठणी लकी ड्रॉचा आगळा वेगळा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम महापुरुषाच्या गीताने वैशिष्ट्यपूर्ण ठरला. सूत्रसंचालन सातारा जिल्हा सचिव उदय भंडारे यांनी केले. चंद्रकांत गायकवाड यांनी आभार मानले.