Social Media : अबब !!! चक्क पाळीव प्राण्यांप्रमाणे 6 मगरींचा सांभाळ करते ‘ही’ मुलगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Social Media : जग हे अनेक चित्र विचित्र आवड असलेल्या लोकांनी भरलेले आहे. जगात अनेक प्रकारचे प्राणी पाळले जातात. काहींना कुत्रे तर काहींना मांजर पाळण्याची आवड असते. मात्र जर कोणाला मगरी पाळण्याची हौस असेल तर … होय आज आपण एका अशा व्यक्तीबाबत माहिती जाणून घेणार आहोत जिने आपल्या घरात एक-दोन नव्हे तर तब्ब्ल सहा मगरी पाळल्या आहेत. ती या धोकादायक प्राण्यांना अगदी आपल्या पाळीव कुत्र्यांप्रमाणेच वागवते. अलीकडेच तिने सोशल मीडियावर याचा एक व्हिडिओ पोस्ट केला, जो पाहून लोकं आश्चर्य व्यक्त करत आहेत.

ती व्यक्ती आहे तैवानमध्ये राहणारी सशिमी. जी मगरींना आपल्या घरामध्ये यथेछ वावरू देते. तिच्या घरामध्ये या मगरी अगदी पाळीव प्राण्यांप्रमाणेच बिनधास्तपणे फिरतात. काही काळापूर्वी सशिमीने तैवानमध्येच एका ब्रीडरकडून पहिली मगर विकत घेतली. यानंतर मगरींशी तिची ओढ वाढतच गेली. याची विशेष बाब अशी कि या सहापैकी आतापर्यंत कोणीही तिच्यावर हल्ला केलेला नाही. Social Media

https://www.instagram.com/p/BoCEhqtF7K4/?utm_source=ig_embed&ig_rid=4ac70ad0-2181-4d13-aa33-a16a49edebe3

मगरींसाठी बनवली बेडरूम

शशिमीने या मगरींसाठी एक बेडरूम देखील बनवली आहे. जिथे त्यांना झोपण्यासाठी उशा आणि गाद्या देखील दिल्या गेल्या आहेत. शशिमी त्यांना बेस्ट फ्रेंड मानते. ”त्यांनाही भावना आहेत, त्यांना वेदनाही जाणवतात”, असेही शशिमी म्हणते. या सर्व मगरींच्या त्वचेवर काटेरी पट्टे आहेत. या पट्ट्याखाली एक सॉफ्ट टिश्यू आहे, ज्याला स्पर्श केल्यावर या मगरी रिऍक्ट करतात, असे शशिमी सांगते.

हे ही वाचा : जेलमधील कैद्यासोबतच चक्क महिला जेलरचे अफेअर, रोज पाठवायची तसले मेसेजेस

हे ही वाचा : आपल्या पाळीव कुत्र्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून महिलेने 1 वर्षात कमावले लाखो रुपये

हे ही वाचा : संसदेत बसून पोर्न पाहत होता ‘हा’ खासदार; महिला खासदार विरोध करत होती तरीही…

Leave a Comment