कोरोनासंदर्भात अफवा आणि धार्मिक तेढ|परभणीत पाच गुन्हे दाखल; एकास अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन घोषीत असतांना परभणी जिल्हातील काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा सोशल मिडीया अकाऊन्टवरून गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रकार आढळून आल्यानंतर जिल्हातील विविध पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यात एकास अटक करण्यात आली आहे तर एक जण फरार झाल्याची माहिती परभणी पोलासांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल अकांऊन्टवरून कोणतीही पोस्ट करताना एकदा विचार कराच नाहीतर जेलवारी ठरलेली आहे.

नवामोंढा पोलीस ठाण्यात बुधवार दि ०८ एप्रिल रोजी आरोपी विवेक प्रभाकर शेट्टे (वय ४२), रा.भाग्यनगर,परभणी व साहिल काश्मीरी (फेसबुक अकाउंट वापरकर्ता) यांनी फेसबुकवरुन धार्मिक तेढ निर्माण करणारी कॉमेन्ट टाकुन धार्मीक भावना दुखावल्या म्हणुन गु .र .न ,१२० / २०२० कलम २९५ अ. ३४ भा.दं.वि सहकलम ६७ अ, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ व सह कलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात विवेक प्रभाकर शेट्टे यास अटक केली आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असुन त्याचा शोध घेण्यात येत आहे.

कोतवाली पोलीस ठाण्यातही ०८ एप्रिल रोजी फेसबुकवर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकुन सामाजिक व्देषाची भावना निर्मान करुन अफवा पसरवली म्हणून आरोपी प्रेम अवचार, रा . देवळगाव अवचार , ता . व जि . परभणी याच्याविरुद्ध
गुरनं . ९९ / २०२० कलम ५०५ ( २ ) भादंवि . सहकलम ५२ आपत्ती व्यवस्थापन कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन त्याचेवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे .
दि . ८ एप्रिल रोजी दोन गुन्हे दाखल झाले असले तरि आज पर्यंत अशा प्रकारचे जिल्ह्यात एकुण ०५ गुन्हे विविध पोलीस ठाण्यास दाखल झाले आहेत . यापुढेही परभणी पोलीसाकडुन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान कोरोनाच्या संबंधाने कोणत्याही अफवा पसरवू नये , तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश , साहित्य सोशल मिडीया (Facebook , Twitter , WhatsApp) ईत्यादी समाजमाध्यमावर टाकू नये . अशा मॅसेजला फॉरवर्ड व लाईक ही करु नका नाहीतर, परभणी सायबरचे सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष असल्याने असे साहित्य संदेश आढळून येताच त्यांचेवर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे . नागरीकांना अशा प्रकारचे संदेश आढळुन आल्यास त्यांनी परभणी नियंत्रण कक्ष १०० , ०२४५२ – २२६२४४ किंवा नजीकच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन परभणी पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.