सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पैसे घेण्यासाठी बोलवून मजुरांना बेदम मारहाण (beating 2 labours) करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना सोलापुरातील माढा तालुक्यात घडली आहे. या मारहाणीचा (beating 2 labours) व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.
दोरीने हात-पाय बांधून मजुरांना बेदम मारहाण, सोलापुरातील धक्कादायक प्रकार pic.twitter.com/MPhFGtWzX1
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) August 22, 2022
काय घडले नेमके?
सोलापुरात दोन मजुरांना कामाचे पैसे घेण्यासाठी येण्याचा निरोप पाठवला. आपल्याला कामाचे पैसे मिळणार याचा आनंद या मजुरांच्या चेहऱ्यावर होता. मात्र हा आनंद काही क्षणात नाहीसा झाला. घरी आलेल्या मजुरांना जबरदस्तीने हात पाय बांधून मारहाण (beating 2 labours)करण्यात आली. त्यांना अतिशय वाईट वागणूक देण्यात आली. ही धक्कादायक घटना माढा तालुक्यातील भुताष्टे गावामध्ये घडली आहे.
भुताष्टे गावातील लाईट पोलचे मुकादम बालाजी मोरे यांच्याकडे विकास नाईकवाडे आणि कसबे हे दोघे मजुर मागील दोन महिन्यांपासून कामाला होते. कामाचे पैसे घ्यायला ये असं सांगून या दोघांना आरोपी बालाजी मोरे, भालचंद्र आनंत यादव यांच्यासोबत आणखी दोघांनी त्यांना मारहाण (beating 2 labours) केली. या प्रकरणी माढा पोलिसांनी चौघांविरोधात अॅट्रासिटी,मारहाण, आणि अपहारण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली