खळबळजनक! अनैतिक संबंधाला विरोध केल्यानं मुलीनेच केला आईचा गळा दाबून निर्घृण खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । मायलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या दिरासोबतच्या अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या आईचा मुलीनेच काटा काढल्याची घटना सोलापुरात घडली आहे. लक्ष्मीबाई माने (वय 40) असं मयत महिलेचे नाव असून मुलगी अनिता जाधव आणि तिच्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस चौकशीत मुलगी अनिताने आपल्या आईचा खून केल्याची कबुली दिली आहे.

सोलापूरच्या पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापुरातील कुमठे येथील महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई माने (वय 40) यांचा मृतदेह 8 नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरात आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिस स्थानकातील अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेहाच्या गळ्यावरील निशाणावरुन गळा दाबून खून केल्याचा प्रथमदर्शी संशय पोलिसांना आला. यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

मृतक लक्ष्मीबाई माने ह्या गेल्या काही वर्षांपासून सावत्र भावासोबत राहत होत्या. त्याच्या भावाला दारूचं व्यसन असल्याने कदाचित वादातून त्याने हे कृत्य केलं असल्याचे पोलिसांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता मृत महिलेची मुलगी आईला भेटण्यासाठी आली होती, अशी माहिती त्याने दिली. त्यावरुन पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आणि या हत्याकांडाचा छडा लागला.

त्यानंतर मृत लक्ष्मीबाई माने यांची मुलगी अनिता जाधव कनार्टकातील विजयपूर येथील तोरवी गावात असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी तात्काळ तपास पथके विजयपूरसाठी रवाना केली. यावेळी संशयित अनिता आणि तिच्या दिराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी दिली.

म्हणून तिने आपल्या आईचा केला खून
आरोपी अनिता जाधव हिने पोलीस पोलीस चौकशीत आपल्या आईच्या खुनाची कुबली देताना हत्येमागेचे धक्कादायक कारण सांगितले. अनिता हिचे आपल्या दिरासोबत अनैतिक संबंध होते. लग्नानंतरच्या काही वर्षांपासून अनिता ही तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. ती आपल्या दिरासोबत संबंधांमुळे त्याच्यासोबत एकत्र राहत होती. मात्र, अनिता आणि तिच्या दिराच्या अनैतिक संबंधांना आईचा तीव्र विरोध होता. दरम्यान, 8 नोव्हेंबरला संध्याकाळी ती दिरासोबत आपल्या आईला भेटायला गेली. यावेळी दोघा मायलेकींमध्ये वादावादी झाली. अनिताची आई लक्ष्मीबाई यांनी पुन्हा एकदा अनिताच्या दिरासोबतच्या संबंधांना विरोध केला. यावेळी वाद विकोपाला गेला आणि अनिताने आपल्या आईच्या तोंडात टॉवेल कोंबून तिचा गळा आवळून खून केला.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

 

 

Leave a Comment