Solapur Earthquake : मोठी बातमी!! सोलापूरला भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू सांगोला

Solapur Earthquake
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोलापूरला भूकंपाचे सौम्य धक्के (Solapur Earthquake) बसल्याची बातमी समोर येतेय. आज ३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ७ मिनीटांनी भुकंपाचे धक्के जाणवले. याबाबत राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने (एनसीएस) माहिती दिली आहे. या भूकंपाची तीव्रता २.६ इतकी होती. सांगोला हे या भूकंपाचे केंद्र होते. परंतु दिलासादायक बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेलं नाही. परंतु पुन्हा भूकंप होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण – Solapur Earthquake

सोलापुरातील या भूकंपाचे धक्के (Solapur Earthquake) पंढरपूर, मंगळवेढा, जत, आटपाडी, वेळापूरपर्यंत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूरमध्ये जमिनीच्या 5 किलोमीटर खाली होते. जमीनीतून आवाज येत असल्यानं नागरिक घराबाहेर पडले होते. त्यांच्यामध्ये भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी प्रशासनानं नागरिकांनी न घाबरण्याचे आवाहन केलं आहे.

सोलापूरपूर्वी, या वर्षी जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात, पालघर जिल्ह्यात ३.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. डहाणूमध्ये पहाटे ४.३५ वाजता हा भूकंप जाणवला. पालघरमधील बोर्डी, दापचरी, तलासरी भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. परंतु त्यावेळीही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. जरी दोन्ही भूकंप सौम्य तीव्रतेचे असले तरी, भूकंपांचे वारंवार होणारे धक्के भूगर्भीय हालचालींबाबत सतर्क राहण्याचा इशारा दाखवतात.