सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरमधील जगदंबा चौकात शहर पोलीस दलाकडून दंगा नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या “मॉक ड्रिल’ची प्रात्यक्षिकं करण्यात आली.आंदोलनकर्त्यांना पोलीस कसे नियंत्रणात आणतात हे यातून दाखवण्यात आलं. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी मोर्चे निघाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामध्ये समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारचे मोर्चे सोलापूरकरांनीही अनुभवले.
याच धर्तीवर पोलिसांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणामध्ये वाहनावरून आंदोलनकर्त्यांवर पाण्याचा मारा करणे, अश्रुधारेच्या कांड्या फोडणे, लाठीचार्ज, गोळीबार या सर्वांची प्रात्यक्षिक रविवारी सोलापूरकरांना अनुभवता आली. पोलीस दलाने अशा प्रसंगी तयारीत असायला हवं शिवाय याबद्दल अधिक दक्ष असायला हवं या हेतूने या मॉक ड्रीलचं आयोजन करण्यात आलं होत.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.