सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज नव्याने 22 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यामध्ये 8 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णामुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 330 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज एक महिला मयत झाली असून ही महिला 65 वर्षांची आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथील महिला नइ जिंदगी येथील नातेवाईकांकडे 18 मार्च रोजी आली होती. लॉक डाऊनमुळे ती महिला याच ठिकाणी नातेवाईकांकडे राहत होती. 12 मे रोजी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या महिलेला गंभीर स्थिती दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान 12 मे रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास या महिलेचे निधन झाले असून या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
आज नव्याने सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये नीलम नगर येथील दोन महिला, रेल्वे लाईन येथील कोनापुरे चाळ मधील एक महिला, कुमठा नाका येथील एक पुरुष, नइ जिंदगी (मुळगाव सुलतानपूर जिल्हा उस्मानाबाद) येथील एक महिला, एमआयडीसी नवनाथ नगर येथील दोन पुरुष एक महिला, अशोक चौकातील तीन पुरुष व चार महिला, न्यु पाछा पेठेतील दोन पुरुष व चार महिला, लष्कर येथील एक महिला असे 22 जण आज कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
अद्यापही 232 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. कोरोना मुक्त झालेल्या 22 जणांना (चौदा पुरुष व आठ महिला) आज घरी सोडण्यात आले आहे. केगाव येथील क्वारंटाइन कॅम्पमधून चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे 88 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.