अवघ्या चार वर्षाचा ‘वंडरबॉय’, तीन जागतिक विक्रम केले नावावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूरच्या तणविर पात्रो या चार वर्षीय बालकाने तीन जागतिक कीर्तीचे विक्रम केले आहेत. इंग्रजी, मराठी, ओडिया, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या तणविरला २७ डिसेंबर २०१८ ला ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डसचा “इंटरनॅशनल अमेझिंग वंडर कीड’ हा किताब मिळालाय तर, २८ डिसेंबर २०१८ रोजी त्याने इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये जागतिक विक्रम केला.

तसेच मार्च २०१९ मध्ये जिनियस बुक ऑफ रोकॉर्ड्स मध्ये “मेस्मेरायझिंग मेमरी कार्ड” हा किताब मिळवला आहे. तणविरला जगातील १२० प्रमुख पुस्तकांच्या लेखकांची नावे, जगातील २५० शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध तोंडपाठ आहेत. त्याचबरोबर जवळपास २०५ देशांच्या राजधान्या, भारतातील २८ राज्य तसेच ९ केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्या आणि त्यांचे मुख्यमंत्रीही त्याला तोंडपाठ आहेत. जगातील ७५ देशांचे ध्वज तो पाहून ओळखू शकतो.  अशा लहान वयात प्रचंड आकलन क्षमता असणाऱ्या तणवीरची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

Leave a Comment