साडे तीन वर्षाच्या ‘विराज’ची चित्तथरारक तलवारबाजी; चिमुरड्याचे कर्तब पाहून नेटकरी थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये लहान मुलांनी मैदानी खेळांकडे पाठ फिरवून मोबाइलमधल्या गेममध्ये व्यस्त असतात. त्यामुळे त्याचे बालपण हरवत असून ती एकाच ठिकाणी गुतुंन पडली आहेत. अशी ओरड पालक नेहमी करतात. दुसरीकडे शहरात असा एक साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. जो तलवारबाजी, दांडपट्टा व लाठीकाठी या सारख्या मैदानी खेळांतून लोकांचे लक्ष वेधतोय. सण, समारंभ आणि जयंती उत्सव कार्यक्रमात तो चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन करतोय. विराज शिवराज पवार असे या बालकाचे नाव आहे. या चिमुरड्याचा खेळ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

चिमुरडा विराज भली मोठी काठी शरीराभोवती गरगर फिरवू लागतो. आणि पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे उमटतात. तलवारबाजी, दांडपट्टा व लाठीकाठी हे खेळ त्याने आजोबा राजकुमार पवार यांच्याकडून आत्मसात केला आहे. त्याचे आजोबा राजकुमार पवार हे दांडपट्टा तलवारबाजी आणि लाठीकाठी चालवण्यात पारंगत आहेत. विविध कार्यक्रमात ते या खेळाचे प्रदर्शन करतात. विविध सण समारंभ आणि कार्यक्रमात ते फेटे बांधण्याचा व्यवसाय करतात. क्षत्रिय गल्लीत राहणारे पवार हे फेटेवाले म्हणून प्रसिद्ध आहेत.

विराज रोजच्या सरावामुळे या खेळात आता पारंगत होत चालला आहे. तो एक वर्षाचा असल्यापासून या खेळांचा सराव करतो. त्याचा हा खेळ सर्वांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. सोशल मीडियात देखील त्याच्या या चित्तथरारक खेळाचे कौतुक होत आहे. बालवयातच कमावलेले हे कौशल्य
त्यांच्या पालकांच्याही अभिमानाचा व कौतुकाचा विषय झाला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment