हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या उन्हाळा सुरु असून गर्मीच्या या दिवसात अंगाची पार लाहीलाही होत आहे. गर्मीपासून सुटका करण्यासाठी अनेकजण घरात एसी, पंखा आणि कूलरचा वापर करत आहेत. परंतु यामधील एसी आणि कूलर खरेदी करणं हे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर असते. त्यांमुळे अनेकजण पंखा खरेदी करण्याला आपली पसंती दर्शवतात. तुम्ही सुद्धा नवा पंखा घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका फॅनबाबत सांगणार आहोत जो लाईट नसली स्त्री फिरतो. आणि महत्त्वाचे म्हणजे याची किंमत फक्त 294 रुपये आहे.
डीसी पोर्टेबल सोलर फॅन असं या पंख्याचे नाव असून हा पंखा 12 व्होल्टच्या बॅटरीवर चालतो आणि सोलर पॅनेललाही जोडता येतो. मुख्य म्हणजे हा पंखा कुठेही सहज बसवता येतो कारण त्याला खूप कमी जागा लागते. यासोबतच तुम्ही या फॅनला बटणाच्या मदतीने चालू आणि बंद करू शकता आणि त्याचा वेगही कमी- जास्त करू शकता. तुम्ही हा पंखा तुमच्या गाडीवर किंवा तुमच्या घरातही ठेऊ शकता.
लाईट गेली तरी चिंता करण्याची गरज नाही कारण लाईट नसली हा सोलर फॅन तुम्हाला भरपूर वेळ हवा देतो. तुम्हांला या पंख्याचा 4 ते 5 तासांचा बॅकअप मिळेल. या पंख्याला एकूण 3 ब्लेड आहेत. हे ब्लेड 1400RPM वर फिरतात. या पंख्याची बुलेट अॅल्युमिनियमपासून बनवली आहे. या फॅनची किंमत फक्त 294 रुपये असल्याने सर्वसामान्य लोकांना नक्कीच परवडणारा आहे.