Sologamy : मुलाशी नाही तर स्वतःशीच लग्न करणार गुजरातची ‘ही’ मुलगी !!!जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Sologamy : अनेक लोकांना लग्नाबाबत खूप उत्सुकता असते, यासाठी ते खूप आधीपासूनच तयारी देखील सुरु करतात. मात्र गुजरातमधून नुकतेच लग्नाचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे… 11 जून रोजी होणाऱ्या या लग्नातील सर्वांत धक्कादायक गोष्ट अशी कि ती मुलगी संपूर्ण रितीरिवाजाने लग्न तर करणार आहे मात्र यासाठी कोणताही नवरा मुलगा नसेल… आता आपण विचार कराल की हे कसे होऊ शकते? चला तर मग हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेउयात…

असे विचित्र लग्न करणाऱ्या मुलीचे नाव क्षमा बिंदू आहे. ती 24 वर्षांची आहे आणि गुजरातमधील वडोदरा येथे राहणारी आहे. क्षमा ही कोणत्याही मुलाशी लग्न न करता स्वतःशीच लग्न करणार आहे. या लग्नात सर्व पारंपारिक विधी देखील होतील. मात्र या लग्नात वर किंवा वरात असणार नाही. असे मानले जात आहे कि, हा गुजरातमधील पहिलाच स्व-विवाह किंवा सिंगल विवाह असेल. Sologamy

Sologamy: ये लड़की रचाएगी अनोखी शादी! मंडप सजेगा, फेरे भी होंगे; लेकिन नहीं होगा दूल्हा

TOI मधील बातमीनुसार, या लग्नाबद्दल क्षमाने सांगितले की, तिला कधीही लग्न करायचे नव्हते. मात्र तिला नवरी व्हायचं होतं. त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली कि,”कदाचित मी पहिलीच अशी मुलगी असेल जिने जगासमोर सेल्फ-लव्हचे उदाहरण ठेवले आहे.” आपल्या लग्नासाठी क्षमाने गोत्रीचे मंदिर निवडले आहे. Sologamy

Explained: Why is the Sologamy trend finding resonance across the globe? -  Oneindia News

लग्नानंतर क्षमा हनिमूनला देखील जाणार आहे. यासाठी ती गोव्याला जाणार आहे. जिथे ती दोन आठवडे राहणार आहे. क्षमाने पुढे सांगितले की, जेव्हा तिने स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या पालकांना खूपच आश्चर्य वाटले. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांच्याकडून परवानगी मिळाली. आता या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी कडून तिला आशीर्वाद देखील मिळाले आहेत.Sologamy

Sologamy: India woman's plan to 'marry herself' sparks debate

हे पण वाचा :

Multibagger Stock : गेल्या सहा महिन्यांत ‘या’ शेअर्समध्ये झाली 645 टक्क्यांची जोरदार वाढ !!!

Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस श्री. छ. वृषालीराजे भोसले यांच्याकडून अभिवादन

‘या’ देशांमध्ये आहे Johnny Depp ची मालमत्ता, एका चित्रपटासाठी घेतो तब्ब्ल 155 कोटी

Leave a Comment