अमरावती प्रतिनिधी | अमरावती जिल्हाच्या अचलपूर परतवाडा शहरामधे विवीध समस्यांच्या निवारणासाठी आज अचलपूर ऊपवीभागीय कार्यालयात ५ विभागांची तातडिची बैठक अधिकारी संदीप अपार यांनी बोलावली होती. यामध्ये अचलपूर पारतवाडा या शहरांमधे वाहतूकीची समस्या , अवैध बांधकाम , व्यावसाईक प्रतीश्ठानांपूढे पार्कीग ची व्यवस्था नसणे , अतीक्रमण, जड वाहणांसाठीची पार्किंग , बस स्थानकापूढील २०० मि. च्या आत ट्रॅव्हल्सद्वारे होणारी अवैध वाहतूक , जयस्थंभ चौकातील सूरेश कॅफे समोरील दूचाकीची कोंडी अशा कीतीतरी समस्या शहरात आहेत.
त्या समस्यांचे निवारण व्हावे यासाठी १ महीन्याआधी अचलपूर परतवाडातील नागरीकांनी ऊपवीभागीय अधिकारी यांना निवेदन देत सवीस्तर चर्चा केली होती .त्यानंतर आज ११ जून रोजी या सर्व विषयांशि निगडीत विभांगातील अधिकार्यांना एसडीओ संदीप अपार यांनी चर्चेकरीता बोलावले, यावेळी चर्चेकरीता आलेले अचलपूर न पा. चे मूख्याधिकारी प्रदीप जगताब यांना जाताजाता काहीतरी काम करून जा असा टोला लगावला . तर पोलीस अधिकारी पोपट अब्दागीरे यांना वाहतूकीच्या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही करा असे आदेश दीले. त्याचबरोबर तहसीलदारांना नदीपात्रात असणार्या अनधिकृत विटभट्ट्यांवर ताबडतोब कार्यवाही चे आदेश दिले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आपल्या हद्दीत असणार्या अतीक्रमण करणार्यांना तात्काळ नोटीस पाठवा असे आदेश दीलेत . तर रेन वाटर हार्वेस्टिंग करणार्या नागरीकांना करामध्ये सूट देण्यात यावी यासाठी विचार करावा असे सूचवीण्यात आले. यावेळी ऊपवीभागीय अधिकारी संदीप अपार ,ऊपवीभागीय पोलीस अधिकारी पोपट अब्दागिरे , तहसीलदार निर्भय जैन ऊपस्थित होते.