हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप खासदार किरीट सोमेय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला असून उद्या ते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याला भेट देणार होते. मात्र आता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यानी त्याना कोल्हापूरात प्रवेश न करण्याची नोटीस दिल्याने खळबळ उडाली आहे.
किरीट सोमय्या यांच्या जीवाला धोका असल्याचे कारण सांगत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांना कोल्हापूरात न येऊ देण्याची नोटीस बजावली आहे. यावरून किरीट सोमेय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असून मी या घोटाळेबाज सरकारला सोडणार नाही असा इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येऊ देऊ नका असा आदेश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले असून तो आदेश पोलिसांनी आपल्याला दाखवला असल्याचे सांगत ही ठाकरे सरकारची दडपशाही असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.