कंगनाची तुलना करण्यासाठी सोनमने ‘हा’ शब्द वापरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी वाटत असल्याचं वक्तव्य केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. कंगनाच्या वक्तव्यामुळे बॉलिवूडचं नव्हे तर मराठी कलाकारही भडकले आहे. मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्यानं ट्विटवरून बॉलिवूड, मराठी कलाकारांनी कंगनावर टीका केली आहे. अगदी रितेश देशमुख, उर्मिला मातोंडकर, रेणुका शहाणे या बॉलिवूड कलाकारांनी मुंबई मेरी जान म्हणत कंगनाला प्रत्युत्तर दिलं.

या सगळ्या वादात सोनम कपूरने एक ट्विट केलं. यामध्ये सोनम कपूरने नाव न घेता कंगनावर टीका केली आहे. ‘मी खूप अगोदर वाचलं होतं. डुक्करासोबत भांडू नये. यामुळे आपल्याच अंगावर चिख्खल उठते. आणि डुक्कराला मजा येते.’

कंगनाच्या वक्तव्यानंतर मुंबईवर मनापासून प्रेम करणाऱ्या मराठी कलाकार कंगनाच्या या विरोधात एकवटले आहेत. कंगना हिने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखने कंगनाला थेट प्रत्युत्तर दिले नसले तरी त्याने सूचक अशी टिप्पणी केली आहे. ‘मुंबई हिंदुस्तान है’ असे त्याने म्हटले आहे.

तर अभिनेता जितेंद्र जोशीने कंगनाला तंबी देत एक सल्ला दिला. ‘ज्या शहराने नाव दिलं, ओळख दिली, मान दिला आणि जगण्याला अर्थ दिला त्या माझ्या मुंबई शहराचा मला अभिमान आहे. जे जे आले त्यांना सामावून घेण्याचा मोठेपणा दाखवाला आहे या शहराने. कृतज्ञता दाखवता येत नसेल तर कृतघ्न तरी होऊ नका.’

https://twitter.com/Jitendrajoshi27/status/1301573953668800512?s=20

आघाडीची मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने कंगनाच्या मंबई विषयीच्या वक्तवयावर आपल्या ट्विटमध्ये फक्त,’मुंबई मेरी जान!’ असं म्हणतं #कर्मभूमी #ILoveMumbai #विषय संपला हे हॅशटॅग वापरले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.