PS4 गेमची मागणी करणाऱ्या मुलाला सोनू सूदने दिलं हटके उत्तर ; म्हणाला की….

0
81
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना मदत केली होती त्यामुळे आता प्रत्येकाला अस वाटतं की, आपल्या सगळ्या प्रश्नांवर सोनू सूद हे एकच उत्तर आहे. सोनू सूद अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत साऱ्यांचाच देवदूत बनला आहे. अशाच पद्धतीने एका विद्यार्थ्याने सोनू सूदकडे PS4 या व्हिडिओ गेमची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर सोनू सूदला एका दहावीच्या विद्यार्थ्याने निरोप दिला आहे. लॉकडाऊनमध्ये माझे सगळे मित्र गेम खेळून एन्जॉय करत आहेत. मला पण PS4 हवा आहे. मला मिळू शकतो का? अस त्या मुलाने सोनूला विचारलं.

विद्यार्थ्याच्या या मागणीवर सोनू सूदने इतकं भारी उत्तर दिलं की सगळेच खूप झाले. सोनू सूद म्हणाला की , जर तुझ्याकडे PS4 नाही तर तू खूप भाग्यवान आहेस. काही पुस्तकं घे आणी वाच. तुझ्यासाठी मी हे नक्की करू शकतो . सोनू सूदचं हे उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here