हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीचे दिवस म्हंटल की, गर्दीचा लोट उसळतो. मग तो बससाठी असो किंवा रेल्वेसाठी. नागरिकांची संख्या ही दोन्हीकडे प्रचंड असते. त्याच गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने (Indian Railways) सणासुदीच्या काळात अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गर्दी आणि त्यामुळे वाया जाणार वेळ ह्या दोन्ही गोष्टी आटोक्यात येतील. 27 सप्टेंबर रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे (South Central Railway) चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर राकेश ह्यांच्या सहीने हा निर्णय संमत झाला आहे.आता या अतिरिक्त रेल्वे गाड्या कुठे सोडल्या जातील आणि कस असेल त्यांचे टाइम टेबल ते जाणून घेऊयात.
कुठे सोडल्या जातील अतिरिक्त गाड्या?
रेल्वेने घेतलेल्या ह्या निर्णयात नगरसोल, पनवेल, दक्षिण भारत ह्यामध्ये तिरुपती, साईनगर शिर्डी, काझीपेठ, दादर, हैद्राबाद,सिकंदराबाद, दानापूर, काचिकुडा, मदुराई, एच. एस. नांदेड, रामनाथपुराम ह्या सारख्या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे.
कसा असेल हा टाइम टेबल? (South Central Railway)
दिवाळी, दसरा, छट ह्या सारख्या सणासुदीसाठी दक्षिण मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिरुपती – साईनगर शिर्डी ही गाडी 15 ऑक्टोबर पासून 26 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. तर साईनगर शिर्डी – तिरुपती ही गाडी 16 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. तर काझीपेठ – ते दादर 4 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर, हैद्राबाद ते रक्सऊल 7 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर, सिकंदराबाद ते दानापूर 7 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर, काचिकुडा ते नगरसोल 13 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर इत्यादी गाड्यांचा ह्यात समावेश असेल.
गाडीची रचना कशी असेल
सोडल्या जाणाऱ्या गांड्यांची रचना ही एकूण 21 कोच = 2 टायर एसी – 1 कोच, 3 टायर एसी – 5 कोच, स्लीपर – 11 डबे, जनरल – 2 डबे , एसएलआर – 2 अशी असणार आहे.
अधिक माहिती वेबसाईटवर मिळेल
सोडलेल्या अतिरिक्त गाड्यांबाबत तुम्हाला जर अधिक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही रेल्वेच्या वेबसाईटवर म्हणजे www.enquiry.indianrail.gov.in मिळवू शकता.