South East Central Railway Apprentice Recruitment 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी भरती, तब्बल 733 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

South East Central Railway Apprentice Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक चांगली बातमी घेऊन आलेलो आहोत. रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते, आणि आता ते स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण आता दक्षिण पूर्वमध्य रेल्वे अंतर्गत (South East Central Railway Apprentice Recruitment 2024) एक मोठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. SECR ने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. हे अर्ज त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मागवलेले आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 733 रिक्त जागांची भरती होणार आहे. 12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया सुरू करा. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पात्रता निकष

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची बारावी पास असणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संबंधित ट्रेडमधील ITI अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा | South East Central Railway Apprentice Recruitment 2024

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय हे 15 ते 24 वर्ष दरम्यान असणे खूप गरजेचे आहे. 24 वर्षापेक्षा जास्त वय असणारे उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

निवड प्रक्रिया

याप्रक्रियेमध्ये दोन्ही मॅट्रिक्स मध्ये 50% गुणांच्या आत त्यांनी मिळवलेले गुण आणि आयटीआय परीक्षेत दोघांना समान महत्त्व दिले जाते.

अप्रेंटिसचा कालावधी

या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले जाईल. प्रत्येक ट्रेडसाठी एक वर्षाचा कालावधीसाठी टिकाऊ प्रशिक्षण दिले जाईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

12 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच तुम्ही अर्ज भरा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.