दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरला झाली कोरोनाची लागण

0
47
Junior NTR
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना नामक विषाणूने कहर केला आहे. दरम्यान कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. सर्वसामान्यांपासून अगदी कलाकारांपर्यंत सारेच या कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यातच आता दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्या चाहत्यांना ह्याबाबत माहिती देण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्याने ही माहिती ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत दिली आहे. तो सध्या होम क्वारंटाइन आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने ही माहिती दिली आहे. त्याने या ट्विटमध्ये लिहिले आहे कि, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून काळजी करू नका, मी अगदी ठीक आहे. माझे संपूर्ण कुटुंब आणि मी घरात आयसोलेशमध्ये आहोत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्ही सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहोत. माझ्या संपर्कात गेल्या काही दिवसात आलेल्या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया तुम्ही कोरोना चाचणी करुन घ्या. सुरक्षित राहा. एकंदर अशा आशयाचे ट्वीट करत ज्युनिअर एनटीआरने त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

जुनिअर एन टी आर हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या त्याला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये अत्यंत काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे चाहते त्याने केलेल्या ट्विटवर रिट्विट करीत त्याने आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी आणि लवकर बरे व्हावे असे सांगत आहेत. तर काहीजण त्याने लवकरात लवकर बर व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. अगदी काहीच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुन यालाही कोरोना झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here