सोयगावातील कर्मचारी दुपारनंतर सुस्त, नागरिक त्रस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  जिल्ह्यातील सोयगाव येथील सर्वच शासकीय कार्यालये दुपारनंतर ओस पडत आहेत, त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातून प्रवासाची दमछाक करून आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट होत नसल्याने पुन्हा माघारी फिरावे लागत आहे.

सोयगाव येथे पंचायत समिती, तहसील, आरोग्य तालुका कार्यालय, सामाजिक वनीकरण, वनविभाग, पोलीस ठाणे, पाटबंधारे विभाग, जलसंधारण, स्थानिक स्तर हे तालुक्यातील कार्यालये दुपारनंतर बंद करण्यात येतात. त्यामुळे दुपारी अधिकारी आणि कर्मचारी गायब होतात यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत.

वरिष्ठ अधिकारी दौऱ्यानिमित्त बाहेर पडल्यावर अधिकारी आणि कर्मचारी टेबलवर हजर राहत नाहीत. अशीच परिस्थिती तालुका कृषी कार्यालयात असून या ठिकाणी तीनच कर्मचारी हजर असतात, तर दुपारनंतर ते देखील भेटत नसल्याने नागरिकांना रिकाम्या हातीच परतावे लागत आहे.

Leave a Comment