IPL 2022 मध्ये धोनी खेळणार की नाही? CSK च्या CEO ने केले मोठे वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. आता उरलेली आयपीएल सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेची तयारी करत असतानाच सर्व टीमनं आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलचे नियोजन सुरु केले आहे. पुढील आयपीएलमध्ये नवीन दोन टीम दाखल होणार आहेत. त्याचबरोबर मेगा ऑक्शनदेखील होणार आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

धोनीने 7 जुलै रोजी आपला 40वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने मागच्या वर्षी 15ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता तो फक्त आयपीएल स्पर्धेत खेळतो. धोनीचा फिटनेस आजही चांगला असला तरी त्याच्या बॅटींगमधील फॉर्म हा चेन्नईसाठी काळजीचा विषय ठरत आहे. त्यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या मेगा ऑक्शननंतर आयपीएल खेळेल का? याची चर्चा होऊ लागली आहे.

सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी धोनीच्या भवितव्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ‘तो पूर्णपणे फिट आहे. तो आणखी किमान एक ते दोन वर्षी सीएसकेकडून खेळेल. त्याने निवृत्ती घेण्याचे कोणतंही कारण मला दिसत नाही. आम्ही त्याच्या कामगिरीवर समाधानी आहोत.तो फक्त कॅप्टनच नाही तर अनुभवी नेता आहे. त्याच्या मार्गदर्शनाचा टीमला नेहमीच फायदा होणार आहे. त्याच्यासारखा खेळाडू टीममध्ये असणे हे महत्त्वाचे आहे. तो उत्तम फिनिशर असून त्याने आजवर ती जबाबदारी पूर्ण केली आहे,’ असे विश्वनाथन यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment