औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव नगरपंचायतीसाठी आज बुधवारी मतमोजणी पूर्ण झाली आहे. एकूण चार जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 21 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. मतमोजणीनुसार 11 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बाजी मारली असून तर भाजपने सहा जागांवर विजय मिळविला आहे. अशा एकूण 17 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. सोयगाव नगरपंचायत निवडणूक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिष्ठेची बनवली होती. यात सत्तार यांनी बाजी मारली आहे. हे दोघेही पारंपरिक राजकीय विरोधक आहे. काही दिवसांपूर्वी सत्तार यांनी दिल्लीत दानवे यांची भेट घेतली होती. या प्रसंगी भाजप-शिवसेना युतीवरुन राजकारण तापल्याचे पाहायला मिळाले.
वर्षभरापासून प्रतीक्षेत असलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदाचीच चर्चा सोयगावात सुरु झाली असल्याने सोयगावात पुन्हा नगराध्यक्षपदावरून राजकीय चर्चांचे गुऱ्हाळ रंगले आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या तेरा जागा आणि दुसऱ्या टप्प्यात झालेल्या चार जागा अशा एकूण 17 जागांसाठी अखेरीस सोयगाव नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आहे. वर्षभरापासून या निवडणुकीची असलेली प्रतीक्षा मंगळवारी संपली आहे. मात्र निवडणूक होताच आता नगराध्यक्षपदाची चर्चा सुरु झालेली आहे. यासाठी मात्र भाजप आणि शिवसेनाच अग्रेसर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातच राजकीय सारीपाट रंगणार आहे. बुधवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. परंतु त्या आधीच अतिआत्मविश्वास असलेल्या भाजप आणि शिवसेनेत नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या चर्चेसह आपलाच नगराध्यक्ष होणार असे दावे प्रतिदावे सुरु झालेले आहे.
विजयी उमेदवार –
वॉर्ड क्र. 1 शिवसेना – शाहिस्ताबी राउफ
वॉर्ड क्र. 2 – शिवसेना- अक्षय काळे
वॉर्ड क्र. 3 – शिवसेना- दीपक पगारे
वॉर्ड क्र.4 – शिवसेना- हर्षल काळे
वॉर्ड क्र.5 – भाजप – वर्षा घनगाव
वॉर्ड क्र.6 – शिवसेना – संध्या मापारी
वॉर्ड क्र.7 – भाजप – सविता चौधरी
वॉर्ड क्र.8 – शिवसेना – कुसुमबाई राजू दुतोंडे
वॉर्ड क्र.9 – शिवसेना- सुरेखाताई काळे
वॉर्ड क्र.10 – शिवसेना – संतोष बोडखे
वॉर्ड क्र.11 – भाजप – संदीप सुरडकर
वॉर्ड क्र.12 – शिवसेना – भगवान जोहरे
वॉर्ड क्र.13 – भाजप- ममताबाई इंगळे
वॉर्ड क्र.14 – भाजप आशियाना शाह
वॉर्ड क्र.15 – भाजप सुलतानाबी देशमुख
वॉर्ड क्र.16 – शिवसेना – गजानन कुडके
वॉर्ड क्र.17 – शिवसेना आशाबी तडवी