मुंबई । जुने वर्ष सरले असतानाच आता २०२१ या वर्षात ४ ग्रहण, ११ उल्कावर्षाव, ३ धूमकेतू, युती-प्रतियुती, सुपरमून, ब्लॅक मून आणि ग्रह पाहण्याची संधी मिळेल. पृथ्वीजवळून सहा धोकादायक लघुग्रह जातील, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
२०२१ मध्ये केवळ ४ ग्रहण होणार असून, त्यात दोन चंद्र व दोन सूर्यग्रहण आहेत. भारतातून मात्र काही भागातून केवळ दोन ग्रहण पाहता येतील. २०२१ मध्ये १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील. काही साध्या डोळ्याने दिसणार आहेत. २ मार्च, २१ मार्च, २५ मे, १ जून, ४ जुलै, १३ जुलै, १४ ऑगस्ट या काळात लघुग्रह पृथ्वीजवळ येणार आहेत. तर २०२१ मध्ये १८ धूमकेतू पृथ्वीजवळ येतील. त्यापैकी बहुतेक दुर्बिणीतून दिसतील.
काही साध्या डोळ्याने दिसतील. २७ मे रोजी ७ पी पॉन्स-विनेक हा धूमकेतू १५ जूनपर्यंत पृथ्वीच्या ०.४४ एयू अंतरावर येईल तेव्हा त्याची तीव्रता १०/११ असेल. तो साध्या डोळ्याने दक्षिण गोलार्धातून दिसू शकेल. तर २७ सप्टेंबर, ९ नोव्हेंबर रोजीही धूमकेतू पृथ्वीजवळ येणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’