निजामुद्दीन मरकज : बेजबाबदारपणा हिंदूंनी केला की त्यांना जनता म्हटलं जातं अन् मुसलमानांनी केलं तर फक्त मुसलमान म्हटलं जातं

विचार तर कराल | हनुमंत पवार

काल सोलापूर जिल्ह्यातील वागदरी खेड्यात यात्रा होती. कोरोनाच्या निमित्तानं यात्रा कमिटीने प्रशासनाला सहकार्य करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. केवळ दोन तीन व्यक्तींनी देवाची पूजा केली. इथपर्यंत सगळ सुरळीत होतं. प्रशासन आणि यात्रा कमिटीच्या संवादाने सगळं शांततेत पार पडतंय असं चित्र होतं. दरवर्षी पुजेनंतर देवाचा रथ ओढला जातो. ही वर्षानूवर्षे चालत आलेली परंपरा. यावर्षी हा कार्यक्रम गर्दी टाळायची म्हणून रद्द केला होता. कांही महाभागांनी एकत्र येत रथ ओढायचा आग्रह धरला. मोठा जमाव जमवून रथ ओढायला सूरूवात केली. उपस्थित पोलीसांनी हे रोखायचा प्रयत्न केला. जमाव हिंसक झाला. यात्रा कमिटीच्या लोकांनी जमावाला शांत करायचा प्रयत्न केला. जमाव ऐकायला तयार नाही. पोलीसांवर जमावाकडून तूफान दगडफेक. वरीष्ट पोलिस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी जखमी, एक होमगार्ड जखमी. शेवटी जादा पोलीस कुमक मागवून परिस्थिती नियंत्रित करण्यात आली. काल 40 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आजही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया दिवसभर सूरू होती.

आपण भारतीय आरोग्य आणि स्वयंशिस्त यापेक्षा धर्म- प्रथा- परंपराना अधिक जवळ करतो. त्यात हे करणारे मुस्लिम असतील तर ते मुस्लिम आहेत म्हणून असं वागतात हे जोरजोरात सांगत सूटतो. मात्र असंच कृत्य हिंदूनी केलं की ते हिंदू असं करतात असं न म्हणता जनतेने, जमावाने, नागरिकांनी केलं असं म्हणतो. बेसिस्त, बेफिकीर वर्तन हिंदूनी केलं की जमाव, जनता, नागरिक अन् हेच बेजबाबदार, बेसिस्त वर्तन मुसलमानांनी केलं की ते जनता, जमाव, नागरिक न ठरता ठरतात फक्त ‘ मुसलमान’…

एकूणात आपला दूटप्पीपणा कोरोनाच्या जागतिक महामारीतसूद्धा दिमाखानं व्देषाचा ध्वज फडकवत मोठ्या ऐटीत उभा आहे. आपण निजामूद्दीन ते वागदरीला एकाच न्यायानं बघायला सूरू करू तेंव्हा असे हजारो व्हायरस पराभूत करू. पण आमच्यातील कांही हिंदू महाभागांना कोरोनापेक्षा मुसलमानांना ठेचनं महत्त्वाचं वाटतं. तर कांही मुसलमानांना कोरोनापेक्षा धर्मशिक्षण, धर्मप्रसार-प्रचार महत्वाचा वाटतोय.

पंढरपूरचं, तूळजापूर, तिरूपती ते काशी विश्वनाथाचं मंदीर बंद तर हिंदूनी आजाराचा धोका समझून घेतलाच पाहिजे अन् उत्तर प्रदेशातलं देवबंद, दिल्ली जामा मस्जिदीचे शाही इमाम घरात नमाज पाढा, मस्जिदीत ऐऊ नका असा ‘ऐलान’ करतात तर मुसलमानांनीही प्रतिसाद दिलाच पाहिजे. लाखो हिंदू-मूस्लिम घरात आहेतही, पण हा प्रयत्न हाणून पाडून वर्षानूवर्षांचं ‘भारतातलं कम्यूनल डिस्टंसिंग’ कायम रहावं म्हणून हजारो कार्यरत झालेत. ते मीडीयात, सोशल मिडीयात, आपल्या अवतीभवती आहेत. आपण जागं राहीलं पाहीजे…

हनुमंत पवार
9823516002

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

धक्कादायक! मुंबईत नवजात बाळ कोरोना पॉझिटीव्ह

काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध

निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून

भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com