Happy Friendship Day | हामिद अंसारी नावाचा मुंबईचा मुलगा फेसबुकवरुन पाकिस्तानच्या एका मुलीच्या प्रेमात पडतो, दोघंही एकमेकांच्या इश्कमधे बुडून जातात. अन् मग एकदिवस प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईचा हामिद थेट पाकिस्तान गाठतो. तेही कसलाही व्हिसा वगैरे न काढता. इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान. प्रेयसीच्या गावात पोहोचल्यावर आता तिला भेटणार इतक्यात तिथं त्याला भारतीय जासूस म्हणुन अटक होते. त्याच्यावर पाकिस्तानी न्यायालयात मुकदमा चालवला जातो. पाहता पाहता सहा वर्ष लोटतात पण हामिद भारतात परतत नाही. तो जिवंत आहे की मेला आहे याचा कसलाही पत्ता त्याच्या घरच्यांना नसतो. आणि अखेर शिक्षा पूर्ण करुन नोव्हेंबर २०१२ साली पाकिस्तानला गेलेला हामिद ६ वर्षांनंतर वाघा बोर्डर वरुन भारतात येतो…पाकिस्तानी सीमा ओलांडून भारतात येताच हामिद जमिनीचं चुंबन घेतो आणि त्याचे डोळे अश्रूंनी ओले होतात. आहे की नाही एकदम फिल्मी लव्हस्टोरी? चला तर मग जाणून घेऊयात हामिद अंसारीच्या ‘इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान’ या फिल्मी लव्हस्टोरीबद्दल…
शाहरुख खान च्या वीर झारा चित्रपटाप्रमाणे मुंबईत राहणार्या हामिद अंसारीला पाकिस्तानच्या एका मुलीवर प्रेम झाले. फेसबुकवरुन झालेली त्यांची मैत्री इश्कमधे कधी आणि कशी रुपांतरीत झाली ते दोघांनाही कळालं नाही. चाटींग करत करत ते एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले व त्यांनी प्रत्यक्षात भेटण्याचं ठरवलं. आणि IT इंजिनिअर असलेला, MBA चं शिक्षण घेतलेला हामिद आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी मुंबईतील घरदार सोडून पाकिस्तानला गेला. मात्र पाकिस्तानात पाऊल ठेवताना त्यानं एक चूक केली. व्हिसा नसताना हामिद पाकिस्तानला गेला. कोणाच्यातरी मदतीने हामिदने अफगानिस्तान मार्गे पाकिस्तानला मधे प्रवेश केला.
हामिद ज्या मुलीला भेटण्यासाठी पाकिस्तानला आला होता ती मुलगी खैबर पख्तूनख्वा प्रातातील कोहाट ची राहणारी होती. हामिद सहीसलामत कोहाट पर्यंत पोहोचला. आता काही वेळातच तो त्याच्या प्रेयसीला भेटणार होता पण काळाने घात केला. पाकिस्तानी पोलीसांनी हामिदला घेराव घातला. विसा नसल्याच्या कारणावरुन आणि जासूस असल्याच्या संशयावरुन हामिदला पाकिस्तान पोलीसांनी अटक केली. आपला देश, घर-दार सोडून प्रियसीला भेटण्यासाठी आलेल्या हामिदला तिचा साधा चेहराही पाहता आला नाही.
पाकिस्तान ने हामिदवर जासूसीचा आरोप लावला. बेकायदेशीरपणे प्रवेश आणि हेरगिरीच्या गुन्ह्याखाली त्याला जेलमधे डांबण्यात आलं. पाकिस्तानच्या न्यायालयात हामिदवर मुकादमा चालवण्यात आला. तो कसा भारतीय हेर आहे? हे पाकिस्तानी सरकारकडून कोर्टात सांगण्यात येत होतं. पाकिस्तानात हामिदचं कोणीच नव्हतं त्यामुळे आता काय कराव हे त्याला कळत नव्हतं. इकडे मुंबईतील त्याच्या आई वडीलांना आपला मुलगा जीवंत आहे का मेला आहे याचा पत्ता नव्हता. अशात जीनत शहजादी या महिला पत्रकाराला हामिद बद्दल कळालं. जीनतने या प्रकरणी बरंच इन्वेस्टिंगेशन केलं आणि खरं काय आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला.
प्रकरण संवेदनशील असल्याने हामिदबाबत अधिक खात्री करुन घेण्यासाठी जीनतने हामिदच्या मुंबईतील आई वडिलांशी संपर्क केला. हामिद खरोखर हेर नाही ना याची तपासणी केली. नंतर हामिद ज्या पाकिस्तानी मुलीला भेटण्यासाठी आला होता त्या मुलीला जीनत स्वत: कोहाटला जाऊन भेटली. त्या मुलीनी आपली ओळख उघड करण्यास नकार दिला. हामिद आणि सदर मुलगी यांच्यातील नात्याबाबत मुलीच्या मित्रांना आणि काही नातेवाईलांना माहिती होती. त्यांना भेटल्यानंतर जीनत ला हामिद निष्पाप असल्याचा विश्वास आला. आणि मग हामिदला सोडवण्यासाठी हरएक मदत करण्याची जीनतने तयारी केली. यामधे पाकिस्तानातील मानवाधिकार वकिल रख्शंदा नाज यांनी सुद्धा जीनतला सहकार्य केले.
इकडे भारतात हामिदच्या वडीलांनी मुलाला सोडावण्यासाठी आपली बँकेची नोकरी सोडली आणि भारत सरकार, पाकिस्तान अॅम्बसी, सर्वोच्च न्यायालय अशा चक्रा सुरु केल्या. पाकिस्तान हामिदला हेर म्हणुन सिद्ध करण्यात कोणतीही कमी पडू देत नव्हते तर पाकिस्तानी मिडीया मानवाधिकाराचा मुद्दा उपस्थित करुन रॅशनल भुमिका मांडत होते. अखेर खूप दिवस चाललेल्या खटल्यानंतर हामिदला तीन वर्षांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र तरीही हामिद मागारी परतेल असं कोणालाच वाटत नव्हतं. पण सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हामिदला रिहा करण्याचा पाकिस्तान सरकारने निर्णय घेतला.
हामिद ज्या मुलीला भेटण्याकरता सीमा ओलांडून पाकिस्तानला गेला होता तो त्या मुलीला आजही भेटू शकलेला नाही. हामिद ज्या मुलीवर प्रेम करत होता तिचं आता लग्न झाल असल्याचं बोललं जात आहे. आजच्या या काळात हामिदची ही लव्हस्टोरी खरंच कोणालाही फिल्मी वाटावी अशीच आहे.
– आझाद
हे पण वाचा –
नेताजी सुभाष चंद्र बोस – The Forgotten Hero
आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला…
या गोष्टी करा आणि पार्टनर सोबतच्या नात्यात गोडवा आणा
इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल