हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. पनवेल ते नांदेड दरम्यान विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही ट्रेन मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून , यामुळे प्रवाशांची निर्माण होणारी अतिरिक्त गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्यासाठी हि बातमी महत्वाची आहे.
पनवेल ते नांदेड विशेष ट्रेन
पनवेल ते नांदेड सुटणाऱ्या गाडीचा क्रमांक 07636 असून , हि ट्रेन पनवेल येथून 7 नोव्हेंबरला दुपारी 4:30 वाजता सुटणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी 8 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता नांदेड येथे पोहोचणार आहे. तसेच नांदेड ते पनवेल गाडी 6 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता नांदेड येथून सुरू होईल, आणि 7 नोव्हेंबरला दुपारी 2:45 वाजता पनवेल येथे येईल.
12 स्थानकांवर थांबणार
हि विशेष ट्रेन कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या महत्त्वाच्या 12 स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाश्यांच्या प्रवासातील समस्या दूर होणार आहेत. दिवाळीच्या सणाच्या वेळी होणाऱ्या प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही ट्रेन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाडीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.