Special FD Scheme : ‘या’ बँकांच्या खास FD वर मिळतंय 8% व्याज; गुंतवणुकीसाठी फक्त 4 दिवस बाकी

Special FD Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Special FD Scheme) देशभरात गुंतवणूकदारांची संख्या चांगलीच मोठी आहे. कोणताही गुंतवणूकदार आपला पैसे गुंतवताना सुरक्षा आणि निश्चित परतावा या दोन गोष्टी आवर्जून लक्षात घेतो. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार सरकारी योजना तसेच बँकेच्या विविध योजनांचा एक भाग होताना दिसतात. दरम्यान, इंडियन बँक व पंजाब आणि सिंध बँक या दोन बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे.

या दोन्ही बँक आपल्या ग्राहकांना विशेष FD योजना ऑफर करत आहेत. (Special FD Scheme) ज्यामध्ये ८% व्याज दिले जात आहे. त्यामुळे सार्वधिक परतावा मिळू शकतो. मात्र, यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त ४ दिवस शिल्लक आहेत. येत्या ३० जून २०२४ रोजी ही स्कीम बंद केली जाईल आणि यानंतर तुमची ईच्छा झाली तरीही तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही. चला तर या दोन विशेष एफडी योजनांविषयी अधिक जाणून घेऊया.

इंडियन बँक विशेष FD योजना (Special FD Scheme)

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने आपल्या ग्राहकांना विशेष एफडी योजना ऑफर केली आहे. यात ग्राहकांना ३०० दिवस आणि ४०० दिवसांची FD करता येईल. यातील ३०० दिवस कालावधीची FD इंड सुप्रीम तर ४०० दिवस कालावधीची FD इंड सुपर म्हणून ओळखली जात आहे. यामध्ये केवळ ३० जून २०२४ पर्यंत गुंतवणूक करता येईल.

इंड सुपर ४०० दिवस – ही इंडियन बँकेची विशेष एफडी आहे. जी कॉल करण्यायोग्य आहे. म्हणजेच यातून तुम्हाला वेळेपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय दिला जाईल. (Special FD Scheme) या एफडीचा कालावधी ४०० दिवसांचा असून यामध्ये १०,००० रुपये ते २ कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या एफडीवर सर्वसामान्यांना ७.२५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.७५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ८% व्याजदर दिला जात आहे.

इंड सुपर ३०० दिवस – हीसुद्धा इंडियन बँकेची विशेष एफडी आहे. जिचा कालावधी ३०० दिवस असून यामध्ये ५००० रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करता येईल. या एफडीवर सर्वसामान्यांना ७.०५%, ज्येष्ठ नागरिकांना ७.५५% आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.८०% व्याजदर दिला जात आहे.

पंजाब आणि सिंध बँक विशेष FD योजना

पंजाब आणि सिंध बँकदेखील आपल्या ग्राहकांना विशेष एफडी योजना ऑफर करत आहेत. यामध्ये ग्राहकांना २२२ दिवस, ३३३ दिवस आणि ४४४ दिवसांची विशेष एफडी करता येईल. या एफडीवर कमाल ८.०५% व्याज उपलब्ध आहे. (Special FD Scheme) पंजाब आणि सिंध बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, २२२ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.०५%, ३३३ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.१०% आणि ४४४ दिवस कालावधीच्या एफडीवर ७.२५% व्याजदर दिला जात आहे. ही बँक सुपर ज्येष्ठ नागरिकांना ४४४ दिवस कालावधीच्या एफडीवर ८.०५% इतका व्याजदर देत आहे.