कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांच्या विचारांनी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या भागात विकास कामांची झाली आहेत. सुपने- तांबवे भाग केवळ विकास कामांची पाठराखण करणारा असल्याने गावांची विकास कामांची भूक थांबताना दिसत नाही. परंतु मीही लोकप्रतिनिधी असल्याने काकांची दूरदृष्टी समोर ठेवून विकास कामांना प्राधान्य देत आलो आहे. शिंदे सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी वाढविला आहे. त्याचप्रमाणे डोंगरी तालुक्यातील विकासासाठी विशेष पॅकेज देण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
गमेवाडी- पाठरवाडी (ता. कराड) येथील 20 लक्ष रुपयांच्या पोहोच रस्ता खडीकरण-डांबरीकरण, कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील, रयत कारखान्याचे संचालक प्रदिप पाटील, बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील, कोयना दूध संघाचे संचालक लक्ष्मण देसाई, कोयना बॅंक संचालक अविनाश पवार, संदिप साळुंखे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, कराड तालुका पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, युवा नेते संतोष जाधव, माजी सरपंच करण जाधव, प्रदिप जाधव, जयवंत जाधव, शिवाजी जाधव, विकास कालेकर, अशोकराज उद्योग समुहाचे शरद चव्हाण व गमेवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, स्व. काकांच्या विचारांची पाठराखण करणारा हा भाग आहे. त्यामुळे येथे कोणतेही राजकारण केले जाणार नाही. केवळ अन् केवळ विकास कामांसह गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. यावेळी म्होप्रे, डेळेवाडी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश जाधव तर प्रास्ताविक वसंत जाधव यांनी केले. आभार रुपेश जाधव यांनी मानले.
सुपने गावची पाणी योजना आ. शंभूराज देसाई यांच्यामुळेच पूर्ण
कराड तालुक्यातील सुपने गावची पाणी योजना बाजार समितीचे माजी संचालक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. यासाठी निधी उपलब्धता करून देण्यापासून सर्व योजना पूर्ण नेण्यासाठी पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांनी पुढाकार घेतला होता. त्याच्या प्रयत्नामुळेच सुपने गावाला सध्याची पाण्याची योजना मिळाली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील यांनी सांगितले.