हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget) उपमुख्यमंत्री विधिमंडळात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. तसेच 2023 पासून सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजने संदर्भात देखील विशेष तरतूद करण्यात आल्याची माहिती दिली.
आज अजित पवारांनी माहिती दिली की, लेक लाडकी योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने 1 लाख 1 हजार रुपये देण्यात येतील. म्हणजेच मुलीच्या जन्मापासून ते ती मुलगी सज्ञान होईपर्यंत सरकार आर्थिक मदत करेल. ही रक्कम कोणत्या मुलींना मिळणार? कशी मिळणार हे आपण जाणून घेऊया.
योजना काय आहे?
लेक लाडकी योजना राज्यातील गरीब कुटुंबातील आणि दारिद्र्य रेषेखालील मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मुलीच्या जन्मापासून ते ती सज्ञान होईपर्यंत आर्थिक मदत करेल. मुलीच्या जन्मानंतर सरकार तिला पाच हजार रुपये देईल. पुढे मुलगी 18 वर्षांची झाल्यास तीला रोख 75 रुपये देण्यात येईल. मात्र या योजनेचा लाभ फक्त पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारकांना घेता येईल. या योजनेनुसार, मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6000 रूपये, ती सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि ती 18 वर्षांची झाल्यानंतर 75,000 रुपये देण्यात येतील.
दरम्यान, राज्य सरकारने लेक लाडकी ही योजना मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार मुलींना एकूण 1 लाख 1 हजार रुपये देत आहे. या योजनेचा राज्यातील लाखो मुलींना फायदा होईल अशी आशा सरकारकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच आज अर्थसंकल्प सादर करताना या योजने संदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आहे.