शनिवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक ! घर गाठणं होणार कठीण, लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन आहे. दररोज हजारो लोक लोकलने प्रवास करतात. तुम्ही सुद्धा लोकलने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने शनिवारी 29 मार्च 2025 रोजी विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कल्याण ते बदलापूर दरम्यान होणारा हा ब्लॉक, रात्री 1.30 वाजेपासून रविवारी सकाळी 4.30 वाजेपर्यंत लागू होईल. रोड ओव्हर ब्रिजवरील गर्डर डी लाँचिंग आणि न्यू पाईपलाईन ब्रिजच्या बांधकामासाठी हा ब्लॉक घेण्यात येत आहे.

लोकल सेवा व लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम

ब्लॉक दरम्यान अंबरनाथ ते बदलापूरच्या लोकल सेवांमध्ये खंड पडेल. काही ट्रेन सेवा रद्द केल्या जातील, तर काही ट्रेनांच्या वेळापत्रकात बदल होईल. उदाहरणार्थ, परळ- अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत धावेल, तर सीएसएमटी- बदलापूर लोकल फक्त अंबरनाथपर्यंतच जाईल.

लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी विशेष व्यवस्थापन करण्यात आले आहे. भुवनेश्वर- सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, आणि होस्पेट- सीएसएमटी एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांना कर्जत आणि पनवेल मार्गे वळवले जाईल, तसेच ठाण्यात थांबवण्यात येईल.

रेल्वे प्रशासनाने इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्गही आवश्यकतेनुसार वळवण्याचे संकेत दिले आहेत. या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठा बदल होण्याची शक्यता आहे.