Special Trains For Christmas : ख्रिसमसनिमित्त मुंबई, नागपूर, पुण्यासाठी विशेष ट्रेन; पहा संपूर्ण वेळापत्रक

Special Trains From Mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Special Trains For Christmas : आगामी ख्रिसमस नाताळ आणि हिवाळी सुट्टीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे कडून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ते नागपूर आणि पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात येणार आहेत. प्रवाशांना या काळात आरामदायी प्रवास करता यावा, त्यांना गर्दीला सामोरे जावं लागू नये यासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. आज आपण या तिन्ही गाड्यांचे वेळापत्रक पाहणार आहोत.

मुंबई नागपुर रेल्वे – Special Trains For Christmas

गाडी क्रमांक ०१००५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शनिवारी सीएसएमटीहून रात्री ००.३० वाजता निघेल आणि दुपारी २ वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात हीच ट्रेन गाडी क्रमांक ०१००६ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून ०७.२० वाजता निघेल आणि सीएसएमटीला १८.५० वाजता पोहोचेल. या ट्रेन मध्ये ०२ सेकंड एसी, ०८ थर्ड एसी, ०६ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम- लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. मुंबई ते नागपूर ट्रेन दादर, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही गाडी १२ डिसेंबर, २७ डिसेंबर २०२५ आणि ३ जानेवारी २०२६ रोजी सीएसएमटीहून आणि १३ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल. Special Trains For Christmas

पुणे- नागपूर -पुणे

ट्रेन क्रमांक ०१४०१ पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर शुक्रवारी पुण्याहून रात्री २१.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.५० वाजता नागपूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ट्रेन क्रमांक ०१४०२ नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष एक्सप्रेस दर रविवारी नागपूरहून सकाळी ११.०५ वाजता निघेल आणि रात्री २३.४५ वाजता पुण्याला पोहोचेल. या ट्रेनच्या रचनेबद्दल सांगायचं झाल्यास, यामध्ये ०४ थर्ड एसी, ०८ स्लीपर, ०४ जनरल आणि ०२ गार्ड-कम-लगेज व्हॅन, एकूण २२ कोच असतील. हि विशेष ट्रेन दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी रेल्वे स्थानकावर थांबेल. ही ट्रेन १२ डिसेंबर, २६ डिसेंबर २०२५ आणि २ जानेवारी २०२६ रोजी पुण्याहून आणि १४ डिसेंबर, २८ डिसेंबर २०२५ आणि ४ जानेवारी २०२६ रोजी नागपूरहून धावेल.