परभणी प्रतिनिधी। खेळामुळे मानवी जीवनात सांघिक भावना दृढ होते, सदृढ शरीरासह बौद्धिक कौशल्यामध्ये वाढ होते. त्यामुळे विद्यार्थीदशेतच सर्व प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये स्वतः देशाचे नाव मोठे करण्यासाठी संधी प्राप्त होते. असं मत आमदार मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केलं.
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी आणि परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी बोर्डीकर बोलत होत्या.
शुक्रवार दि . 13 डिसेंबर रोजी खा .संजय जाधव आणि जिंतुरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत परभणी या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. येथे पार पडले. ॲथलेटिक्स प्रकारांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव गाजवणाऱ्या ज्योती गवते हिचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. ज्योती गवतेने नुकत्याच काठमांडू नेपाळ येथे पार पडलेल्या 13 व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये मॅरेथॉन स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून दिल आहे. तिच्या या यशाबद्दल तिचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्योती गवते ही जिल्ह्यातील इतर खेळाडूंसाठी एक आदर्श आहे. हे सांगायला हि बोर्डीकर यावेळी विसरल्या नाहीत.