IPL 2020 ची तारीख ठरली? या महिन्यात स्पर्धा घेण्याचा BCCI चा प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे BCCI ने IPL 2020 चे आयोजन करण्यासाठी नियोजन सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे. यंदा ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलचे आयोजन करण्यासाठी वेळ मिळू शकेल.

आजच (मंगळवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर्षी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणे शक्य नसल्याची कबूली दिली आहे. वर्ल्ड कपचे आयोजन होणे ही गोष्टी खुपच अवघड आहे. १६ संघांना ऑस्ट्रेलियात आणणे सोपी गोष्ट नाही. कारण अनेक देशात अद्याप करोना व्हायरस आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स म्हणाले. यानंतर BCCI चा IPL 2020 स्पर्धेचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं जात आहे.

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार BCCI IPL 2020चे आयोजन २६ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. स्पर्धाचा कालावधी ८ नोव्हेंबरपर्यंत असू शकतो. ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात वर्ल्ड कप नियोजित आहे. पण करोनामुळे ही स्पर्धा स्थगित किंवा रद्द होऊ शकते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएलमधील अधिकतर सामने दक्षिण भारतात होऊ शकतात. कारण त्या भागात मान्सून अधिक सक्रिय नसेल.

पायाभूत सुविधा, चार आंतरराष्ट्रीय स्टेडियम, प्रवासातील सुलभता आणि उच्चभ्रू हॉटेल्स या साऱ्या गोष्टी पाहता BCCI ची IPL 2020 साठी पहिली पसंती मुंबई शहरालाच होती. पण कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तेथे स्पर्धेचे आयोजन करणे टाळले जात आहे. कर्नाटक किंवा तामिळनाडू हा देखील पर्याय BCCI पुढे उपलब्ध आहेत. करोनाची प्रकरणे या राज्यातही आहेतच, पण TNPL आणि KPL सारख्या स्पर्धा जेथे खेळवल्या जातात, त्या ठिकाणी IPL 2020 चे आयोजन करणे शक्य आहे. कारण, IPL चे आयोजन विनाप्रेक्षक करायचे असल्याने स्टेडियमचा आकार किती मोठा आहे? याने फारसा फरक पडणार नाही.

रिपोर्टनुसार बीसीसीआयने अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. तसेच स्पर्धेतील ८ संघांना याबद्दल अद्याप सांगितले गेले नाही. या सर्व नियोजनावर अद्याप चर्चा सुरू असल्याचे समजते. अर्थात सप्टेंबर महिन्यात आशिया कप देखील आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. या सर्वातून मार्ग काढल्यानंतर देखील हे मात्र निश्चित असेल की यावेळी होणारी IPL स्पर्धा ही तुलनेत छोटीच असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”