परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यातील विद्यालयांमध्ये क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक शाळेतील क्रीडा मैदान विद्यार्थी खेळाडूंच्या उपस्थितीने फुलून गेले आहेत. तर त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लहान-मोठ्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षक म्हणुन उपस्थिती लावली जात आहे. प्रत्येक शाळेमध्ये थैलारेस, लिंबू-चमचा, दोरीवरच्या उड्या, लंगडी, धावणे, संगीत खुर्ची, असा नेहमीच्या मनोरंजन करणाऱ्या स्पर्धांचे आयोजन केल जात आहे.
मात्र, पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेने मागील काही वर्षापासून अभ्यासक्रम पूरक व विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगला खेळाडू म्हणून निवड होत नावलौकिक व्हावा म्ह्णून पारंपारिक, मनोरंजनात्मक खेळांना बगल देत, विविध प्रकारच्या स्पर्धाक्षम खेळांचे आयोजन केलं आहे. त्यामध्ये बॉल बॅडमिंटन,सेपेक टेकरा ,टेनिक्वाइट (रिंग टेनिस), टेनिस व्हॉलिबॉल, शटल बॅडमिंटन,व्हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सी खेच,शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, इत्यादी खेळ लहान व मोठ्या गटात खेळवले जात आहेत.
मागील काही वर्षांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे विविध क्रीडा स्पर्धा प्रकारांमध्ये शाळेला यश मिळवून दिलं आहे. या ठिकाणचा विद्यार्थी ग्रामीण भागात प्रशिक्षित होत, शहरी भागातील प्रशिक्षित खेळाडूंना सहजगत्या आव्हान देत आहे. विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळावं म्हणून लवकरच शाळेमध्ये सुसज्ज मैदानाची ही निर्मिती करण्यात येणार आहे. यात शाळेतील मैदानात दोनशे मिटरचा लालमातीचा रनिंग व जॉगींग ट्रॅक, पाच छोटी मैदाने यांचा समावेश असेल.
या कामाची सुरुवात ही करण्यात आली. याशिवाय क्रिडा साहीत्य उपलब्ध करण्यासाठी गावकरी यांनी वर्गणीचा वाटा उचलणार आहेत असे शालेय व्यवस्थापण अध्यक्ष यांनी सांगितल. या स्पर्धा आयोजनासाठी यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याधिपिका चव्हाण एस . व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षक स्वामी यू .जी ,क्रीडा शिक्षक शेख मुजीब, शिक्षक शंकर धावारे, श्रीनिवास कासले, सचिन वाघ, जाधव , संदीप सुत्रावळे, राधाकृष्ण गवारे,अक्षय कटारे, कनिष्ठ सहायक शिक्षिका ज्योति गोरे व सेविका सुशीला किरवले परिश्रम घेत आहेत.