नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात कोरोना व्हायरस विरोधात लढणारी रशियन लस Sputnik V ची उपलब्धता झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कॅव्हिडशील्ड आणि कोवॅक्सिन लसींबरोबरच रशियन लस Sputnik V देखील देण्यात येणार आहे. मात्र Sputnik V ने आता Sputnik Light नव्या लसीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या लसीची एकच मात्रा पुरेशी आहे. सध्या उपलब्ध असलेल्या इतर लसी या दोन वेळा घ्याव्या लागतात. मात्र नव्या Sputnik Lightची एकच मात्रा पुरेशी आहे. अशी माहिती Sputnik V कडून मिळाली आहे. हे स्पुटनिकचे क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे.
नवी Sputnik Light ही लस कोरोना व्हायरस वर 80 टक्के प्रभावी आहे. आणि दोन मात्रा घेण्यापेक्षा एका मात्रेत प्रभावीपणे काम करते. Covid-19 च्या सध्याच्या काळात ही लस अत्यंत प्रभावीपणे काम करेल असा दावा लसीच्या निर्मिती कंपनीकडून करण्यात आला आहे.
Introducing a new member of the Sputnik family – a single dose Sputnik Light! It’s a revolutionary 1-shot #COVID19 vaccine with 80% efficacy – higher than many 2-shot vaccines. Sputnik Light will double vaccination rates and help to handle epidemic peaks: Sputnik V pic.twitter.com/zw6JrywUOp
— ANI (@ANI) May 6, 2021
उपग्रहावरून लसीचे नामकरण
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियाने जगातील पहिली लस तयार केली. रशियाने लसीचे नामकरण Sputnik V त्यांच्या पहिल्या उपग्रहावरून केले आहे. सोवियत युनियन ने 4 ऑक्टोबर 1957 रोजी जगातले पहिले उपग्रह स्पुटनिक प्रक्षेपित केला. शीतयुद्धाच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रह रशियाची एक मोठी उपलब्धी मानली जात होता. पुतीन यांनी गेल्यावर्षी म्हटलं होतं की ही अत्यंत प्रभावीपणे कार्य करते आणि चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते सर्व आवश्यक चाचण्या लसीने उत्तीर्ण केल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. रशियातील करोना व्हायरस लस गमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूट आणि रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने तयार केली आहे

Sputnik V लस 91.6 टक्के प्रभावी
Sputnik V 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेतील फायझर 90 टक्के प्रभावी दिसून आली आहे. देशातील कोवॅक्सिन आणि कॅव्हिडशील्ड या दोनच लस उपलब्ध आहेत. कोवॅक्सिन 81% प्रभावि आहे तर कॅव्हिडशील्डची कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत आहे. आता रशियन लस Sputnik V भारतातील एकमेव लस असेल जी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.
भारतात ही उत्पादन
ही लस तयार करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडस मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार लसीची किंमत दहा डॉलरच्या खाली आहे जेणेकरून ही लस सातशे रूपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध होईल. डॉक्टर रेड्डी यांच्या प्रयोगशाळेत भारतात Sputnik V लस विकसित करत आहे. 91.6 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे. अमेरिकेतील फायझर 90 टक्के प्रभावी दिसून आली आहे. देशातील कोवॅक्सिन आणि कॅव्हिडशील्ड या दोनच लस उपलब्ध आहेत. कोवॅक्सिन 81% प्रभावि आहे तर कॅव्हिडशील्डची कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत आहे. आता रशियन लस Sputnik V भारतातील एकमेव लस असेल जी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे.